
मुख्यमंत्री यांनी शिवरायांची शप्पथ घेत हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची जाणीव ही मराठा समाजाला करून दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ही प्रामाणिक पणे अभ्यासपूर्वक सुरू आहे.
कणकवली : आम्ही सकल मराठा समाज बांधव सुरुवातीपासूनच या मराठा आरक्षणाची मागणी संदर्भात सक्रियपणे काम केले आहे. अनेक मोर्चात सहभागी होत आम्ही शांततेत अनेकदा ती मागणी केली आहे. त्यामुळे सरकार अनेक बैठकातून या विषयी सकारात्मकता दर्शवलेली आहे, त्यात आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्व परिस्थितीत खंबीरपणे सरकारच्या पाठीशी आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी कणकवली सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी मराठा समाजाचे माजी सभापती प्रकाश सावंत, बँक संचालक विठ्ठल देसाई, किशारे राणे, प्रसाद सावंत, समिर प्रभुगावकर, प्रज्ञेश उर्फ शिवा राणे, बँक संचालक समीर सावंत, संतोष पुजारे, सागर राणे, सर्वेश बागवे, लक्ष्मण घाडीगावकर, सुभाष मालंडकर, अंगन दळवी, सुधीर सावंत, महेंद्र गावकर, नितीन राणे, सदानंद चव्हाण, श्रीकांत सावंत, दत्ताराम काटे, आशिष राणे, अमोल घाडीगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, आम्हा मराठा समाजाची पुर्ण खात्री आहे की, हे सरकार आमच्या मागणीनुसार कायद्याच्या कसोटीवर कोर्टात टीकणारे आणि कोणत्याही समाजावर अन्याय न करणारे, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावणारे असे शाश्वत आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री यांनी शिवरायांची शप्पथ घेत हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची जाणीव ही मराठा समाजाला करून दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ही प्रामाणिक पणे अभ्यासपूर्वक सुरू आहे. त्याला अधिक गती मिळून आरक्षण लवकरात लवकर मिळावे, यासाठीच आमची ही मागणी सरकार दरबारी सादर व्हावी. आमचा सर्व सकल मराठा समाज या सरकारच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आहे. आमची आरक्षणाच्या विषयाला गती देण्याची मागणी आपण सरकार पर्यंत पोहोचवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.