सिंधुदुर्गमध्ये उत्तर भारतीय लोकांची संघटना करुन भाजपा काय साध्य करु पाहतेय – परशुराम उपरकर

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एकीकडे या परप्रांतीयांनी सिंधुदुर्गातील युवकांचा रोजगार हिरावून घेतला आहे.

    कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर शिवसेना, काँगेस, मनसे, आताचे सर्व पक्ष आहेत. त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उत्तर भारतीय लोकांना कोणीही पाठीशी घातले नाही. चोरी, दरोडेखोर, महिलांवर अत्याचार आदी गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांचा विचार केल्यास अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश, बिहार मधील गुन्हेगारच सर्वत्र जास्त प्रमाणात आढळत आहेत. आता त्या उत्तर भारतीयांची संघटना बांधून भाजपने सिंधुदुर्गमध्ये केली आहे. १२ बलुतेदारी काम करणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येत आहे. भाजप उत्तर भारतीयांची संघटना करून काय साध्य करणार? असा सवाल मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उत्तर भारतीय लोकांमुळे बेरोजगारी वाढेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

    कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एकीकडे या परप्रांतीयांनी सिंधुदुर्गातील युवकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. अकुशल कामगारांपासून कुशल कामगारांची सर्व कामे हे परप्रांतीय बळकावत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील स्थानिक युवक मात्र बेरोजगार होत आहेत. एकीकडे आमदार नितेश राणे परप्रांतीयां विरोधात बोलत असताना दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीयांची संघटना स्थापन करून त्यांचे लाड करत आहेत. या परप्रांतीयांची नोंदणी सुद्धा रीतसर पोलीस यंत्रणेकडे होत नाही. त्याकडेही पोलीस अधीक्षकांचे लक्ष मनसे वेधणार आहे. या विरोधात सर्व पक्ष आणि एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे, असे मत परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.

    भाजप विरोधात निर्माण झालेल्या वातावरणामुळे अपयशनेचे भीती निर्माण झाल्यामुळेच उत्तर भारतीयांची सिंदूर गाठ संघटना भाजपने स्थापन केली आहे. भविष्यात एखाद्या गावाचा सरपंच हा उत्तर भारतीय झाला तर नवल नसेल. सिंधुदुर्गात जिल्ह्यात गरीब, अल्पवयीन मुलींना, महिलांना फूस लावून पळवून नेण्यामध्ये परप्रांतीयांची नावे मोठ्या प्रमाणात समोर येतात. परप्रांतियांकडे यावेळी दुर्लक्ष केल्यास भविष्यात उत्तर भारतीय सरपंच सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. जिल्ह्यात पंधरा वर्षे वास्तव्य करून असलेले परप्रांतीय लोक उत्तरप्रदेश, बिहारमधील आपल्या गावी जाऊन पंधरा, वीस कामगार एकत्र करतात. तसेच त्यांना जिल्ह्यात आणतात. त्यामुळे येथील बारा बलुतेदारांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे.

    उत्तर भारतीयांचे लोण जिल्ह्याभर भाजप पसरवत आहे. जिल्हावासीयांनी एकत्रितपणे ते रोखायला हवे, अन्यथा पुढील काळात पश्चाताप करायची वेळ येईल. परप्रांतीयांची संघटना करून भाजप मतांची बेरीज करीत असेल तर त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी एकत्रितपणे उत्तर देण्याची गरज आहे. आता जागे झाला नाहीत तर पुढील काळात जागे होऊन काहीच उपयोग नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी गावात आलेल्या परप्रांतीयांबाबतच्या आपल्या तक्रारी मनसेकडे द्याव्यात. परप्रांतीयांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन करावे, मनसे त्याला निश्चितच पाठींबा देईल, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले.