
सिंधुदुर्ग डाक विभागाने राबविलेल्या या डाक सप्ताहास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील नागरिकांकडून मिळाला.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गगनबावडा, करुळ, तळेरे या रस्त्याची पाहणी करत शिवसेनेच्या वतीने पदयात्रा ३० ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. ३० ऑक्टोंबरला रस्त्याची दुरवस्था झाल्याने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना उपतालुकाप्रमुख उत्तम लोके आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
या पदयात्रेत शिवसेना आ.वैभव नाईक, माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, निलम पालव, सुशांत नाईक आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या गगनबावडा, करुळ, तळेरे या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची दुरावस्था आहे. त्यावर लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम घेणार आहोत. यापूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने वैभववाडी मध्ये रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. प्रशासनातील अधिकारी यांना जाब विचारला होता. आतापर्यंत कुठलाही परिणाम या प्रशासनावर झाला नाही. खराब रस्त्यातून गणेश चतुर्थी झाली. पर्यटक, व्यापारी, रहिवाशी, वाहनचालक, रिक्षा चालक अन्य वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्राशी आपला व्यापारी संबंध आहेत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता २१ किलो मिटर लांबीचा आहे, १ डिसेंबर २०२२ रोजी निविदा झाली होती. मात्र कोणतेही काम सुरू झाले नाही. या रस्त्यासाठी २५० कोटी खर्च आहे, निविदा प्रक्रिया १८३ कोटी रुपयांची अपेक्षित होती. मात्र, ४० टक्के बीलो ने हे काम भवानी कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे गेले आहे, ११० कोटी रुपयांना निविदा उघडण्यात आली. या रस्त्यावर पावसाळी डांबर वापरून खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी होती. कुठलेही काम सुरु झालेले नाही. महामार्ग प्राधिकरण ने ३० ऑक्टोबर पूर्वी काम सुरु करावे. या रस्त्यासाठी अडलेले जागा संपादन करावे, पुढील काळात दिवाळी येणार आहे. वैभववाडी, कणकवली तालुक्यातील लोकांना जास्त त्रास होत आहे. व्यापारी लोकांना त्रास होत आहे. जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला आहे असे अतुल रावराणे म्हणाले आहे.
सिमेंट काँक्रिटचा हा २१ किलो मिटर लांबीचा रस्ता आहे. गगनबावडा ते तळेरे त्या रस्त्याची ४० टक्के बिलो निविदा कशी? या निविदेची चौकशी व्हावी. हे काम करताना कमिटी स्थापन होऊन ते काम पाहिले जाईल, असा इशारा शिवसेना कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग डाक विभागाने राबविलेल्या या डाक सप्ताहास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील नागरिकांकडून मिळाला. या सप्ताहात डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ लोकांनी घेतला. या सप्ताहात महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर विशेष भर देण्यात आला. डाक विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या “महिला सन्मान बचत योजनेची” एकूण १२२३ नवीन खाती उघडण्यात आली आली. तसेच इतर बचत योजनेची २२६४ नवीन खाती उघडण्यात आली.
या डाक सप्ताहात जीवन विमा योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, ग्रामीण भागातील जनतेला जीवन विम्याचे व बचतीचे महत्व कळावे यासाठी “डाक-चावडीच्या” माध्यमातून या योजेनांची माहिती देण्यात आली. या सप्ताहात डाक जीवन विम्याचे एकूण २१९ नवीन प्रस्ताव व रु. ३१, ५२, १५२/- इतका नवीन प्रीमियम जमा करून ५. २५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करण्यात आले.
डाक विभागाचा कणा असलेली टपाल सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी व वितरण अधिक चांगले होण्यासाठी तालुक्याच्या पोस्ट कार्यालयात पोस्टमन व वितरण प्रणालीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे कार्य शिबीर मा. डाक अधिक्षक यांचे उपस्थितीत घेण्यात आले. “ढाई आखर पत्र लेखन” स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत जिल्ह्यातील विविध ७५ शाळांना भेटी देण्यात आल्या, यात ३, १५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन “नए भारत के लिए डिजीटल इंडिया” या विषयावर आपले निबंध सादर केले.
यावर्षीचा डाक सप्ताह अधिक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. या सप्ताहास जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग श्री. मयुरेश कोले यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील सर्व डाक या कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात आपले योगदान दिल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचेही आभार व्यक्त केले. डाक विभागाच्या अश्याच नवनवीन योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपने पोचविण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग तत्परतेणे काम करीत राहील अशी ग्वाही यावेळी अधिक्षक डाक विभाग यांच्यामार्फत देण्यात आली.