कराडला अंगणवाडी सेविकांचा जबाब दो मोर्चा ; सेविकांना दरमहा २५ हजार तर मदतनिसांना २० हजार वेतनाची मागणी

अंगणवाडी सेविकांना दरमहा 25 हजार रुपये आणि मदतनिसांना दरमहा वीस हजार रुपये वेतन द्या, यासह अन्य मागण्यासाठी कराड तालुका अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, सामाजिक युवा मंच यांच्यावतीने बुधवारी येथील तहसीलदार कार्यालयावर जवाब दो मोर्चा काढण्यात आला.

    कराड  : अंगणवाडी सेविकांना दरमहा 25 हजार रुपये आणि मदतनिसांना दरमहा वीस हजार रुपये वेतन द्या, यासह अन्य मागण्यासाठी कराड तालुका अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, सामाजिक युवा मंच यांच्यावतीने बुधवारी येथील तहसीलदार कार्यालयावर जवाब दो मोर्चा काढण्यात आला.

    यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाच्यावतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात, सर्वोच्च न्यायालयाच्या दि. २५ एप्रिल २०१७ रोजी ग्रॅज्युयटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. त्यात म्हटल्यानुसार अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषीत करावे. ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी आदि सामाजिक सुरक्षा आदी सर्व लाभ देण्यात यावेत. अंगणवाडी सेविकांना दर महिना रु. २५ हजार व मदतनीसांना २० हजार रुपये वेतन देण्यात यावे. सेवा समाप्तीनंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावा. अशा मागण्या या आंदोलनात करण्यात आपल्या आहेत.

    या आंदोलनात अंगणवाडी संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षा नूरजहाॅं शिकलगार, उपाध्यक्षा सुकेशनी गाडे यांच्यासह संगीता गुरव, अनिकेत साळुंखे, सचिव अजयभाऊ सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सागर लाखे, सुरज घोलप, मनोज बडेकर, विक्रम साठे, अभिषेक कोरडे, विक्रम सूर्यवंशी, कृष्णत पांढरपट्टे आदींसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.