कराड आरटीओ जप्त वाहनांचा लागणार बोली ; 16 जुलै रोजी जाहीर ई-लिलाव

मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयाअंतर्गत जप्त केलेल्या ११ वाहनांचा जाहीर ई. लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड येथे दिनांक १६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.

  कराड : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयाअंतर्गत जप्त केलेल्या ११ वाहनांचा जाहीर ई. लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड येथे दिनांक १६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. सदर वाहने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या आवारात दि. १३ ते १६ जुलै २०२२ दरम्यान कार्यालयीन वेळेल पाहणी करण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

  लिलावात २ ट्रक, २ रिक्षा, २ टाटा समो, ५ टाटा इंडिका अशी एकूण ११ वाहने आहेत. ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील, याची मालकांनी नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

  ई लिलाव होणा-या वाहनांची यादी जिल्हाधिकारी सातारा, प्रांतअधिकारी व तहसिलदार कार्यालय कराड तसेच कराड उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कराड सुचना फलकावर जनतेच्या माहीतीसाठी लावण्यात आलेली आहे.

  जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी दि १३ ते १६ जुलै २०२२ कालावधीमध्ये www.eauction.gov.in या
  संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. ई लिलावात भाग घेणा-या प्रत्येक इच्छुकानी ५० हजार रककमेचा डी. डी ( D.Y. T.C (ARAD) या नावे रक्कमेचा डीमांड ड्राफ्टसह ऑनलाईन  सादर केलेल्या कागदपत्राच्या प्रती नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व अप्रैवल करुन घेणेसाठी सादर करणे गरजेचे आहे. ५०० MAND RAFT) लिलावाच्या अटी व नियम दिनांक १३/०६/२०२२ पासून कार्यालय कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कराड येथील नोटीसबोर्डावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार असल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कराड यांचेकडून कळविण्यात आले आहे.

  सदर वाहने “जशी आहेत तशी” या तत्वावर जाहीर लिलावाव्दारे विकली जाईल तसेच वाहनाचा चेसेसचा तुकडा जमा करणेचे आहे. कोणतेही कारण न देता सदर जाहीर ई लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधन अधिकारी, कराड यांनी स्वतः कडे राखून ठेवले आहे.