कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भाजप आक्रमक, खर्गेंच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन

कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, आज प्रियंका खर्गे यांनी कर्नाटकच्या विधानसभेमधून त्या ठिकाणी असलेले सावरकरांची प्रतिमा या ठिकाणी काढून टाकू अशा पद्धतीचे विधान केले आहेत.

    कल्याण : कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजपने राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी, मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी प्रियांक खरगे यांच्या प्रतिकारात्मक फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले.

    पुढे बोलताना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गप्प का असा सवाल केला. तसेच इथून पुढे जर सावरकरांचा अपमान कुणी केला तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल त्यांना त्यांची औकात दाखवू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी कल्याण भाजपा जिल्ह्यात युवा मोर्चा अध्यक्ष वैभव गायकवाड माजी आमदार नरेंद्र पवार शहराध्यक्ष वरुण पाटील कल्याण भाजप पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    आंदोलनादरम्यान कल्याण भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी सांगितले की, काँग्रेस नेते प्रियांक खडगे यांनी जे वक्तव्य केलं आहे की, त्यांना आपल्या सावरकरांचा फोटो नकोय तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो एकदा ते तुरुंग प्रवास ज्यांनी केलेला आहे ते त्यांनी करून बघावं आणि नंतर त्यांना समजेल की त्यांची लायकी काय आहे आणि जनता नक्कीच त्यांना त्यांची लायकी दाखवून देणार, आम्ही युवा मोर्चातर्फे त्यांचा निषेध करतो आणि यापुढे कोणीतरी आमच्या सावरकरांबद्दल कोणी काय सांगितलं युवा मोर्चा नेहमीच रस्त्यावर उतरेल व त्यांना त्यांची औकात दाखवून देणार.

    कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, आज प्रियांक खर्गे यांनी कर्नाटकच्या विधानसभेमधून त्या ठिकाणी असलेले सावरकरांची प्रतिमा या ठिकाणी काढून टाकू अशा पद्धतीचे विधान केले आहेत. मुळांमध्ये काँग्रेसचा हा सावरकर द्वेष आहे आणि सावरकरांच्या द्वेष करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे या महाराष्ट्रामध्ये सातत्याने त्यांच्या बरोबर आहेत. आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे आमच्या संजय राऊत यांना सवाल आहे. आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे प्रियांक खर्गे यांनी केलेल्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का? असा सवाल केला.

    यावेळी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की, काँग्रेसचे खर्गे आता ते अशा प्रकारचा संभ्रम आम्हा सगळ्या देशाला झालेला आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जे मोठे योगदान दिलं ते योगदानाविषयी यांना बिलकुल माहिती नाही म्हणजे यांना या देशांमध्ये राहण्याचा अधिकार नाही असे सांगितले.