कर्नाटक सरकार हल्ले करतेय आणि राज्य सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देत आहे हे दुर्देवी – जयंत पाटील

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहेत अशामध्ये राज्यसरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून हे काम करत असतील तर हे दुर्देवी आहे.

    मुंबई : सीमा भागातील (Border Area) लोकांचे प्रश्न सोडवण्यात (Peoples Problems) हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास (Chatrapati Shivaji Maharaj History) चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे (Present Wrong Way). महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे (Maharashtra Projects Going To Gujarat),याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे.

    त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा (Morcha ON 17th December by MVA) काढण्यात येणार आहे यासर्वांवर विचार राष्ट्रवादीच्या बैठकीत (NCP Meeting) केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP state president and former water resources minister Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

    गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहेत अशामध्ये राज्यसरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून हे काम करत असतील तर हे दुर्देवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात जयंत पाटील शिंदे – फडणवीस सरकारवर यांनी हल्लाबोल केला.

    काँग्रेस आणि आप यांच्या मतांमध्ये विभागणी झाली त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये मिळाला आहे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले.