तळेगावात  करवसुली मोहीम सुरु ; वेळप्रसंगी मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा इशारा

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून घरपट्टी  व पाणीपट्टी  वसुलीची  धडक मोहीम हाती  घेण्यात आली आहे. यासाठी प्रसंगी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश  संबंधितांना  देण्यात आल्याची मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक  यांनी दिली.

  तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून घरपट्टी  व पाणीपट्टी  वसुलीची  धडक मोहीम हाती  घेण्यात आली आहे. यासाठी प्रसंगी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश  संबंधितांना  देण्यात आल्याची मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक  यांनी दिली.

  तळेगाव दाभाडे शहरातील सर्व  मालमत्ताधारकांना त्याचे मालमत्ताची घरपट्टी,  पाणीपट्टीची बिले पाठविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत  सर्वांना ही बिले पोहोचती  होतील. यावर्षी  सन २०२२-२३साठी ४३  कोटी २४  लाख ३  हजार रुपयांचा  मालमत्ता कर  वसूल  करावयाचा आहे. तर ८ कोटी रुपयांची पाणी पट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी कर संकलन अधिकारी  विजय  शहाणे, पाणी पुरवठा अधिकारी  स्मिता गाडे हे वसुली मोहीम  राबवित आहेत.

  कर वसुलीसाठी कडक धोरण
  घरपट्टी वसुलीसाठी  मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक  आणि  उपमुख्याधिकारी  सुप्रिया शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली कडक वसुली  धोरण राबवण्यात येत आहे. पाणीपुरवठा अधिकारी स्मिता गाडे म्हणाल्या,  यावर्षी  संपुर्ण  वर्षात १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ठ ठेवलेले असून  वसुलीसाठी कडक धोरण अवलंबलेले आहे.

  पाणीपट्टी वसुली बरोबरच बेकायदेशीर नळजोड असणाऱ्या मालमत्ता धारकांनी १५ ऑगस्टपर्यंत नियमानुसार नगरपरिषदेत भरणा केला नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

  - विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी.