
राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. कोरोनामुळे गाभाऱ्यात जाऊन थेट दर्शन घेणे बंद होते. पण उद्यापासून 29 ऑगस्टपासून पुन्हा गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे.
कोल्हापूर: सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यापासून सणासुदीला सुरुवात होते. त्यामुळं राज्यभर धार्मिक वातावरण आहे. यामुळं कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक भक्तांसाठी महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर येत आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे (Ambabai Mandir) दर्शन गाभाऱ्यात जाऊन आता थेट दर्शन घेता येणार आहे. अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. (karveer niwasini ambabai can be visited in the gabhara guardian minister kesarkar announcement said)
कोरोनामुळं बंद होते दर्शन
दरम्यान, राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. कोरोनामुळे गाभाऱ्यात जाऊन थेट दर्शन घेणे बंद होते. पण उद्यापासून 29 ऑगस्टपासून पुन्हा गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे. असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते. उद्या मंगळवारपासून अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे, त्यामुळं भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी
श्रावण महिन्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. कोरोनानंतर अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. गाभार दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. कोल्हापूरच्या अंबाबई मंदिरात भाविकांची श्रावण महिन्यात गर्दी होत आहे.