Katangi's Nitish Domale joins UPS! Success Achieved 559

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील मुळचे रहिवासी व सद्या गोरेगाव येथे स्थायिक झालेले नितीश दिलीपकुमार डोमळे यांनी (५५९ रँक) युपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे.

    गोंदिया : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२१ च्या परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये  महाराष्ट्रातील ५ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील मुळचे रहिवासी व सद्या गोरेगाव येथे स्थायिक झालेले नितीश दिलीपकुमार डोमळे यांनी (५५९ रँक) युपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे.

    नितीश यांचा जन्म गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथे झाला असून त्यांचा पहिली ते चौथीपर्यंतचा प्राथमिक शिक्षण कटंगी या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाला आहे. त्यानंतर त्यांचा ५ ते १० पर्यंतचा शिक्षण गोरगाव येथील पी.डी. रहांगडाले विद्यालयात झाल्यानंतर गोंदिया येथील मनोहर म्युन्सीपल हायस्कूल येथे त्यांनी बाराव्या वर्गात यश संपादन केले. विशेष म्हणजे, नितीश हे दहाव्या व बाराव्या वर्गाच्या परीक्षेत मेरीट मध्ये होते.

    दरम्यान, त्यांनी डॉ. पद्मश्री विठ्ठलाव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहमदनगर येथे बी. ई. मॅकेनिकलची परीक्षा उत्तीर्ण केली. तर दिल्ली येथील श्रीराम कोचिंग क्लासेस मध्ये वर्ग लावून राष्ट्रीय लोक सेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी केली. नितीश यांचे आई बाबा दोन्ही शिक्षक असून बाबा मागील वर्षी गोंदिया तालुक्यातील पांढराबोडी येथील जीईएस शाळेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई गोरगाव तालुक्यातील हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. विशेष म्हणजे, नितीश यांनी इंजिनियरींग मध्येही टॉप केले असल्याचे नितीशचे वडील दिलीपकुमार डोमळे यांनी संगितले. तर नितीशच्या ताई डॉ. प्रेरणा या सुध्दा एमबीबीएस झाल्या असून मागील महिन्यात तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.