कातरखटाव आणि येरळवाडी गावांचा चुकीच्या पद्धतीने कुरोली गटात समावेश रद्द करावा ; माजी उपसभापती पोपट मोरे व ग्रामस्थ आक्रमक

निवडणूक आयोगाच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद नवीन गट निर्मिती मध्ये सिद्धेश्वर कुरोली जिल्हा परिषद गटात कातरखटाव व येरळवाडी या गावांचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आला असून याबाबत निवडणूक आयोग व संबंधित प्रशासनाने यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करत गट रचनेवर माजी उपसभापती पोपट मोरे व ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडा जाहीर झाला

    वडूज : निवडणूक आयोगाच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद नवीन गट निर्मिती मध्ये सिद्धेश्वर कुरोली जिल्हा परिषद गटात कातरखटाव व येरळवाडी या गावांचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आला असून याबाबत निवडणूक आयोग व संबंधित प्रशासनाने यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करत गट रचनेवर माजी उपसभापती पोपट मोरे व ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे.
    जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडा जाहीर झाला असून खटाव तालुक्यातील नवीन गट रचनेनुसार तालुक्यात बुध आणि सिध्देश्वर कुरोली हे नवीन दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गण वाढले आहेत.सिद्धेश्वर कुरोली गटात कातरखटाव व येरळवाडी या गावांचा चुकीच्या पद्धतीने समावेश केला असल्याचे म्हणणे माजी उपसभापती पोपट मोरे यांनी हरकतीद्वारे मांडले आहे.त्यामुळे ही रचना गैरसोयीची आहे हरकतीमध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषद पंचायत समिती मधील सर्व निवडणुकांनंतर अधि सूचनांवर हद्दीत झालेले बदल व भौगोलिक बदल, नवीन रस्ते, पूल ,इमारती इत्यादी विचारात घेण्यास कळवले होते, विभाग क्रमांक 21 निमसोड गटाला देण्यात आला आहे.या गटात पूर्वीपासून कातरखटाव व येरळवाडी या गावांचा समावेश होता.येरळा नदी या नैसर्गिक व भौगोलिक सलगतेला छेद देऊन कोणतीही भौगोलिक सलगता नसलेल्या सिद्धेश्वर कुरोली गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. दळण वळनानुसार ही गावे कधीही सिद्धेश्वर कुरोली गावाला जोडली नव्हती.विकासकामे करताना मोठी अडचण निर्माण होणार असून ग्रामस्थांवर अन्याय होत आहे.

    सदरची प्रभाग रचना तयार करताना राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही,त्यामुळे सदर प्रभाग रचनेत दुरुस्ती करावी किंवा रद्द करावी,सदर गट,गण मांडणी करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता आहे.प्रभाग रचना करताना अगोदर काही प्रमाणात झाली होती व उर्वरित प्रकिया त्यानंतर पार पडली,या गटाची रचना अशी होणार तशी होणार अशी अगोदरच खुलेआम चर्चा झाली होती व रचनाही तशीच झाल्याने प्रभाग रचनेच्या गोपनीयतेच्या मुख्य अटीचे उल्लंघन झाले आहे.तसेच सीमारेषा, मोठे रस्ते, नद्या, नाले, स्मशानभूमी, दवाखाने,इत्यादीचा विचार करण्यात आला नाही, त्यामुळे कातरखटाव व येरळवाडी या गावांचा सिद्धेश्वर कुरोली गटात झालेला समावेश काढण्यात येऊन पूर्वीच्या निमसोड गटात यावा अशी मागणी माजी उपसभापती पोपट मोरे यांनी हरकतीद्वारे केली आहे.