डोंबिवलीतल्या लोढा संकुलातील १२ व्या मजल्यावरून तो निघाला होता आत्महत्या करायला पण…

नैराश्याने ग्रासलेल्या बसलेल्या अनिकेतला अग्निशमन दलाच्या जवानांनी समयसूचकता दाखवित त्याला कळते न कळण्याच्या आत न दिसता त्या परिसरात पोहचत १२व्या मळ्यारील सज्याच्या अर्ध ओपन भितीकडून दोरीचा फास टाकून त्याला अलगद वर उचलून सुरक्षित सुटका केली.

  • केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा प्लान केला फ्लॉप

कल्याण :- कल्याण डोंबिवली मनपाच्या (KDMC) अग्निशमन दलाच्या जवानांच्या (Fire Brigade) कार्यतत्परतेने (Prompt Action), प्रसांगावधनामुळे १२व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या (Suicide) करणाऱ्या युवकाचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानांच्या धाडसामुळे वाचविल्याची घटना घडल्याने अग्निशमन दलाच्या जवानाच्या कौतुकास्पद कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील (Dombivali East) लोढा संकुलातील (Lodha Complex) अर्चिड एल् इमारतीतील युवक १२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या तयारीत होता. या घटनेबाबत पालवा फायर स्टेशन मध्ये काँल प्राप्त झाल्याने तातडीने अग्निशमन गाडीसह दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असता १२व्या मजल्यावरील सज्याच्या अर्ध ओपन असणाऱ्या भितीवरून उतरत सज्याच्या भिंतीवर बसलेला होता.

नैराश्याने ग्रासलेल्या बसलेल्या अनिकेतला अग्निशमन दलाच्या जवानांनी समयसूचकता दाखवित त्याला कळते न कळण्याच्या आत न दिसता त्या परिसरात पोहचत १२व्या मळ्यारील सज्याच्या अर्ध ओपन भितीकडून दोरीचा फास टाकून त्याला अलगद वर उचलून सुरक्षित सुटका केली.

संभाव्य दुर्घटना टाळल्याचे पाहता उपस्थितांनी सुटेकचा निश्वास टाकला. पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेतले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे स्टेशन ऑफिसर सुधीर दुशिंग यांनी संपर्क साधला असता दिली. युवकाला सही सलामत बाहेर काढण्यासाठी फायर स्टेशन अधिकारी सुधीर दुशिंग, विकास चव्हाण, सुरेश गायकर या अग्निशमन दलाच्या जवानांनी कसब पणाला लावले.

अनिकेत पवार (Aniket Pawar) वय सुमारे २७ वर्षीय युवक हा भाडेकरू म्हणून या इमारतीत राहत होता. नोकरी गेली होती. त्यात बायको सोडून गेल्याने तो नैराश्याने ग्रासला होता. त्यात त्याला दारूचे व्यसन लागले होते. तर आजच विघुत पुरवठा खंडित केल्याने तो आणखीच नैराश्यात गेल्याने त्याने हे पाऊल उचले असावे अशी चर्चा यानिमित्ताने होत होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नेमके काय घडले ते लवकरच समोर येईल.