
पावसाळयापूर्वी आणि नंतर प्रशासनाचे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि भरण्याचे काम सुरु असते. खड्डे भरत असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तसेच भरलेले खड्डे सेट होण्यास कालावधी मिळत नाही. सततच्या वाहतुकीमुळे भरलेल्या खड्ड्याची परिस्थिती जैसे थे होते.
कल्याण : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी (To Fill Potholes) ‘पॉट फील फिक्स’ (Pot Feel Fix) सेटिंग तंत्रज्ञानाने (Settings Technilogy) पालिका प्रशासनाकडून (KDMC) नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कल्याण स्टेशन (Kalyan Railway Station) परिसरातील रस्त्यावर खड्डा बुजवून दाखवण्यात आले आहे. या कामाचा दर्जा तपासून (Quality Check) हे तंत्रज्ञान सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यावर यशस्वी ठरल्यास पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे शहर अभियंता अर्जुन अहिरे (City Engineer Arjun Ahire) यांनी यावेळी सांगितले.
पावसाळयापूर्वी आणि नंतर प्रशासनाचे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि भरण्याचे काम सुरु असते. खड्डे भरत असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तसेच भरलेले खड्डे सेट होण्यास कालावधी मिळत नाही. सततच्या वाहतुकीमुळे भरलेल्या खड्ड्याची परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे या दरम्यान अनेक सिमेट आणि काँक्रिटच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्याकडून आपल्या प्रोड्क्टच्या किफायतशीरपणाचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातच आणखी एका कंपनीने केडीएमसीतील शहरातील खड्डे कमीत कमी वेळेत बुजविण्याचे आणि त्याचबरोबर दर्जा राखण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे.
बुधवारी कल्याण पश्चिमेकडील सर्वाधिक रहदारी असलेल्या स्टेशन परिसरातील रस्त्यावर या तंत्रज्ञांनाचा प्रयोग करण्यात आला. पॉट फील फिक्स सेटिंग असे या तंत्रज्ञानाला नाव देण्यात आले आहे. यात रस्त्यावरील खड्ड्यात खड्डा भरेल इतके पाणी ओतले जाते यानंतर या पाण्यातच खडी, सिमेंट आणि इतर जलद घट्ट होणारे रसायन मिक्स असलेले कॉंक्रीटचे मिश्रण ओतण्यात आले. या मिश्रणावर वरून पाण्याचा फवारा मारत त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली.
त्यात असणाऱ्या रसायनच्या मिश्रणावर दाब पडताच हे मिश्रण खड्ड्यात घट्ट बसत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यावर हा प्रयोग करण्यात आला असून डांबरी रस्त्यावरील खड्डयासाठी देखील हा प्रयोग केला जाणार आहे. तसेच हे पॉट फिलिंग किती दिवस टिकणार आणि त्याचा दर्जा कसा आहे याची तपासणी करून या पद्धतीचा वापर खड्डे भरण्यासाठी करायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता जनि घनश्याम नवागुळ, उप अभियंता बोरसे, अभियंता सुहास पवार, सांगळे, महाजन, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे आदी उपस्थित होते.