kdmc pre monsoon special cleaning drive to start will pick up rabbits construction materials bushes from roads nrvb

या मोहिमेअंतर्गत बांधकाम विभागाचे ५ जेसीबी व ५ डंपर्स व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यरत ५ जेसीबी व १० डंपर्स यांचा वापर करून सर्व दहा प्रभागात दैनंदिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता २ उपमुख्य स्वच्छता अधिकारी, १० सहा आयुक्त १० स्वच्छता अधिकारी ३४ स्वच्छता निरिक्षक, व सफाई कामगार कार्यरत राहणार आहेत.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील क्षेत्रातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर रॅबीट, बांधकाम साहित्य, झाडी इत्यादी पडलेले मटेरियल व साहित्य उचलून घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते मान्सूनपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचा (Pre Monsoon Cleaning Drive) शुभारंभ सुभाष मैदान (Subhash Ground) येथे करण्यात आला. यावेळी उप मुख्य स्वच्छता अधिकारी ए. एल. घुटे, वसंत देगलूरकर सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरिक्षक व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

    या मोहिमेअंतर्गत बांधकाम विभागाचे ५ जेसीबी व ५ डंपर्स व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यरत ५ जेसीबी व १० डंपर्स यांचा वापर करून सर्व दहा प्रभागात दैनंदिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता २ उपमुख्य स्वच्छता अधिकारी, १० सहा आयुक्त १० स्वच्छता अधिकारी ३४ स्वच्छता निरिक्षक, व सफाई कामगार कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी मान्सूनपूर्व स्वच्छता करून गाडीत कचरा साहित्य देण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्तांनी केले आहे.