Dombivli The rickshaw puller KDMC buses rushed to the aid of the passengers

डोंबिवली-बदलापूर एकात्मिक बससेवेसाठी ‘केडीएमसी’ आग्रही असून, याबाबत केडीएमसीनं शासनाला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असून, हा प्रकल्प व्हावा यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं बोललं जातंय.

    कल्याण : कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरकरांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर येत आहे. (Dombivli-Badlapur integrated bus service) याला कारणही असेच आहे. कारण या शहरांत वाढती लोकसंख्या लक्षात घेता, केडीएमसीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हानगर, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या शहरांना जोडणारी एकात्मिक बससेवा असावी, अशी कल्पना पुढे आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. त्यामुळं जर ही बससेवा सुरु झाली, तर अनेक लोकांचा फायदा होईल, असं बोललं जातंय. (Dombivli-Badlapur Bus)

    मुख्यमंत्री या प्रकल्पासाठी आग्रही…

    दरम्यान, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हानगर, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या शहरांतील वाढते उद्योगधंदे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, दळवळण अधिक सोपे होईल. तसेच ही बससेवा सुरु झाली तर थोड्याफार प्रमाणात रेल्वेवरील ताण कमी होईल. त्यामुळं डोंबिवली-बदलापूर एकात्मिक बससेवेसाठी ‘केडीएमसी’ आग्रही असून, याबाबत केडीएमसीनं शासनाला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असून, हा प्रकल्प व्हावा यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं बोललं जातंय.

    नवी मुंबई परिवहन उपक्रमांत ५००पेक्षा अधिक बस

    नव्या प्रस्तावानुसार उपक्रमाच्या बस भिवंडी, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथसह मुंबई महानगर क्षेत्रातील भागांतही प्रवासी वाहतूक करू शकतील. सध्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या तीन महापालिकांच्या बससेवा आहेत. यापैकी ठाणे आणि नवी मुंबई परिवहन उपक्रमांत ५००पेक्षा अधिक बस असून नवी मुंबई परिवहनने कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खोपोली या शहरांत आपले जाळे विस्तारले आहे. परिवहन उपक्रमांना लागून असलेल्या शहरांच्या हद्दीत प्रवासी वाहतूक करण्यास मुभा एमएमआरडीएने यापूर्वीच दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेसह लगतच्या पालिकांनी घेतला आहे.