
केडीएमसीने दुसरी रुग्णवाहिका पाठविल्याने मृतदेह कल्याणमध्ये आणला. रुग्णालयातील रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही ही बाब देखील समोर आली आहे.
कल्याण : रुक्मीणीबाई रुग्णालयातील महिला प्रसूती प्रकरणात वस्तूस्थिती वेगळी होती. असा खुलासा केडीएमसीच्या आरोग्य विभागाने केला होता. मात्र खुलाशाच्या दोन तासातच आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना बोलवावे लागले. महिला प्रसूती प्रकरणाची आयुक्तांच्या मार्फत चाैकशी सुरु आहे. दोषीवर कारवाई केली जाईल. घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र आरोग्य सेवेची आणखीन एक समस्या समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह घेऊन येत असताना रुग्णवाहिका बंद पडली. केडीएमसीने दुसरी रुग्णवाहिका पाठविल्याने मृतदेह कल्याणमध्ये आणला. रुग्णालयातील रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही ही बाब देखील समोर आली आहे.
महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जात नाही. याची बोंब नेहमीच नागरीकांकडून केली जाते. त्याठिकाणी योग्य प्रकारे सेवा सुविधा पुरविल्या जाव्यात अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून वारंवार केली जाते. या रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग हा अपुरा आहे. त्यामुळे नागरीकांना आरोग्याच्या सेवा मिळत नाही. त्याचा प्रत्यय महिला प्रसूती प्रकरणातून पुन्हा समोर आला आहे. या घटनेनंतर सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एक खुलासा करण्यात आला. त्या खुलासानुसार या प्रकरणात डॉक्टर आणि स्टाफ यांची काही एक चूक नव्हती. या संदर्भात दिलेल्या बातम्यांची वस्तू स्थिती वेगळी आहे असे म्हटले आहे. चूक मान्य नाही याचा अर्थ कारवाईचा प्रश्नच नाही. मात्र या प्रकरणावर खुलाशाच्या दोन तासानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन खुलाशाच्या उलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. जे घडले ते चुकीचे होते. डॉक्टरांकडून गैरवर्तन झाले असेल त्याची सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून चौकशी केली जाईल.
हे सर्व सुरु असताना आरोग्य सेवेची दुसरी समस्या आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह शवविच्छदेनासाठी जेजेला पाठविला होता. पोलीस आणि नातेवाईक त्या मुलीचा मृतदेह जेजे रुग्णालयात नेणार होते. तेव्हा रुग्णवाहिका सुरु होत नव्हती. त्याचे ऑइल लिकेज होते. पोलिसांनी केडीएसीला सूचीत करुन दुसरी रुग्णवाहिका मागवली. यावरुन रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. हे या घटनेतून उघड झाले आहे.