kdmc securit offficer bharat bule

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरली आहे. पालिकेच्या स्थापनेपासून आजमीतिला पालिकेचे अधिकारी कर्मचारी असे मिळून तब्बल 38 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

    कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे (Bharat Bule) याला खाजगी सुरक्षा रक्षकांकडून एक हजार रुपये घेताना ठाणे एसीबीने (ACB) रंगेहाथ अटक (Arrest) केली आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकाकडे भरत बुळे याने महिन्याला दोन हजार रुपयांची मागणी केली होती यामधील एक हजार रुपये घेताना त्याला अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे आणखी काही खाजगी सुरक्षारक्षकाकडून बुळे दर महिन्याचे पाचशे रुपये घेत असल्याचा देखील खुलासा या प्रकरणात झाला आहे. या प्रकरणी ठाणे एसीबी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुळे यांनी आणखी कोणाचे नाव सांगितले का हे आता उर्वरित तपासात पुढे येईल.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरली आहे. पालिकेच्या स्थापनेपासून आजमीतिला पालिकेचे अधिकारी कर्मचारी असे मिळून तब्बल 38 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. आज ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक सुरक्षा रक्षक भरत बुळे यांना एक हजाराची लाच स्वीकारताना अटक केली.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून खाजगी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे . होम बाबा टेकडी येथे कार्यरत असलेला एका खाजगी सुरक्षारक्षकाकडून भरत बुळे याने महिन्याला दोन हजार रुपयाची मागणी केली होती. पैशांसाठी बुळे हा तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सापळा रचला आणि भरत बुळे याला 2000 मधील एक हजार रुपयाची रक्कम घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

    महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. त्यामधील एक तक्रार आज उघडकीस आली आहे. शासकीय सुरक्षा रक्षकाकडे देखील बुळे पैशांची मागणी करत असल्याचे बोलले जातेय. या प्रकरणी एसीबीकडून बुळे याची चौकशी सुरू असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. महानगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आता सुरक्षा विभागापर्यंत पोहोचली त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या याखाबो गिरीला आवर घालणं तितकंच गरजेचं बनलं आहे.