प्रदूषणास जबाबदार असलेल्या बिल्डरांना केडीएमसीचा दणका, २५ बिल्डरांना पाठवल्या नोटिस

    कल्याण : प्रदूषणामुळे कल्याण डोंबिवली शहरातील हवेची गुणवत्ता खालवली असल्याने ज्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी धूळ निर्माण होते. अशा बांधकाम प्रकल्पधारकांनी त्यांच्या साईटच्या भोवती पत्र्यांचे संरक्षण उभारन्यासह धुळप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले होते .या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २५ बिल्डरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यालयापासून नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील साई कृष्णा या बांधका साइटचे बांधकाम बंद केले. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पदभार स्वीकारताच प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यांनी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे.

    मुंबईसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात हवेची गूणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने मुंबई महापलिकेस चांगलेच फटकारले होते. न्यायालयाने फटकारल्यानंतर विविध महापालिकांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेतल्या होत्या. ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवत किमान ३५ फुट उंच पत्रे उभारले पाहिजेत. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना हिरव्या कापड, ज्यूट शीट, ताडपत्रीने चारही बाजूंनी बंदिस्त करावे. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी. त्याठिकाणीची पाहणी करण्याकरीता पथके नेमली होती. ज्या ठिकाणी अंमलबजावणी केली जात नाही. त्याठिकाणची व्हिडीओग्राफी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २५ बिल्डरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यालयापासून नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील साई कृष्णा या बांधका साइटचे बांधकाम बंद करन्यात आले आहे.