
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीवहन उपक्रमामध्ये १०० बसेस वेगवेगळया मार्गावर कार्यरत आहेत. परंतु सदर बसेस प्रवाशी वाहतूक करण्यास अत्यंत धोकादायक व अपघात ग्रस्त आहेत. काही गाडीतील चालक सीट, दगड आणि लाकडी दांडयाचा आधाराने चालक गाडी चालवत आहे. याचबरोबर ब्रेक पायडल, क्लच पायडल विटांच्या आधाराने चालविली जात आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) परिवहन विभागाच्या (Transport) नादुरुस्त बसेसमुळे (Faulty Buses) चालक वाहकांसह बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे (Passengers In Danger). याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनच्या (KDMC Transport Mazdoor Union) वतीने गुरुवारी कल्याणच्या आरटीओ कार्यालयावर मोर्चा (March on RTO office) काढण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे (Union founder president Prafulla Mhatre) यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेस प्रफुल्ल म्हात्रे यांच्यासह संघटक बाबाजी शिंदे, सरचिटणीस अरविंद तांबे, सचिव किरण सपकाळे, कार्याध्यक्ष विष्णू आव्हाड, संघटक संजय पांडे, संदीप क्षोत्री, शांताराम परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीवहन उपक्रमामध्ये १०० बसेस वेगवेगळया मार्गावर कार्यरत आहेत. परंतु सदर बसेस प्रवाशी वाहतूक करण्यास अत्यंत धोकादायक व अपघात ग्रस्त आहेत. काही गाडीतील चालक सीट, दगड आणि लाकडी दांडयाचा आधाराने चालक गाडी चालवत आहे. याचबरोबर ब्रेक पायडल, क्लच पायडल विटांच्या आधाराने चालविली जात आहे. तसेच पूर्ण निखळलेले शॉकपसर, रशीने बांधलेला गिअर दांडा आणि दगडयाचा आधाराने सावरलेले बोनेट, गाडीतील निखळलेले धोकेदायक प्रवाशी दांडे, अशा प्रकारे बहुतांश बसेसची दयनीय अवस्था झाली आहे.
त्यामुळे प्रवाशी आणि चालक वाहक हे अपघाताचे बळी ठरत आहे. स्पीड ब्रेकवर बस आदळून अपघात होवून वाहकाला जबर इजा झाली आहे. एका बसच्या बोनेटचा पत्रा निखळून पडल्यामुळे वाहकाचा पाय बोनेटच्या होलमध्ये जावून अपघात होऊन तो अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये होता असा प्रकारे अनेक अपघात होवून प्रवाशी आणि कर्मचारी अपघात ग्रस्त होत आहेत.
परिवहन उपक्रमातील गाडयाचे देखभाल व नियंत्रण करण्याचे काम ठेकेदार एएमसी कंपनीचे मालक बद्रीश यांना ठेका दिला आहे. यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण करण्याचे अधिकार आगार व्यवस्थापक संदीप भोसले आणि परीवहन व्यवस्थापक दिपक सावंत, कार्यशाळा प्रमुख तुशांत मुळीक यांचे आहेत. परंतु हे अधिकारी परीवहन चालविण्यास सक्षम नसल्या कारणाने प्रवासी जनतेचा जीव धोक्यात घालून कल्याण परीवहन उपक्रमातील बसेस मार्गस्थ होत असल्याचा आरोप युनियनने केला आहे.
यासाठी कल्याण महानगरपालिका उपक्रमातील सर्व बरोसची पाहणी करून प्रवासी वाहतूकीस योग्य असणाऱ्या बसेस चालविण्याबाबत परीवहन उपक्रमाला आदेश देण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने केला असून याबाबत परिवहन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या गुरुवारी गणेश घाट डेपो दे कल्याण आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.