केदार दिघेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, डुबलीकेट आणि चोरलेला माल भाजपसोबत…

काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची चंद्रपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shiv Sena) ही खरी शिवसेना तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना, असा उल्लेख केला होता.

    काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची चंद्रपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shiv Sena) ही खरी शिवसेना तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना, असा उल्लेख केला होता. मात्र त्यांनी केलेल्या या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी शिवसेनाच असा उल्लेख केल्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांनी नरेंद्र मोदी आणि शाहांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

    केदार दिघे म्हणाले, जेव्हा ओरिजनल शिवसेना भाजपसोबत होती तेव्हा भाजपला पक्ष फोडावे आणि चोरावे लागत नव्हते. आता चोरलेली शिवसेना सोबत असतानाही तुम्हाला फोडलेली राष्ट्रवादी का लागते? असे सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभेवेळी ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना असे ते म्हणाले होते. मात्र त्यांनी केलेल्या या विधानानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भाजपमधील केंद्रीय नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोदी आणि अमित शाह यांनी नकली शिवसेना असे म्हण्टल्यानंतर केदार दिघे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. केदार दिघे म्हणाले, चोरलेली शिवसेना सोबत असताना भाजपला फोडलेली राष्ट्रवादी का लागते जेव्हा ओरिजनल शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा तुम्हाला अशा फोडलेल्या पक्षांची गरज कधीच भासत नव्हती यावरून सगळे स्पष्ट होत आहे, असे केदार दिघे म्हणाले.

    ओरिजनल शिवसेना ही ठाकरेंची शिवसेना, असे एक्सवर ट्विट करत लिहिले आहे. शिवसेना पक्ष फोडून गदाराने भाजपने सोबत घेतले. त्यांना शिवसेना नाव आणि चिन्ह दिले. मात्र ओरिजनल शिवसैनिक हे मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिले. जे डुबलीकेट आणि चोरलेला माल होते ते भाजपसोबत गेले, असे म्हणत केदार दिघे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.