खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूलची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

गोवा इंटरनॅशनल रोबोटिक फेस्टिवल-२०२४ नामांकनमध्ये कोच अशफाक चौगुले यांचे विशेष योगदान

    गोवळकोट एजुकेशन सोसायटी संचलित, अजिजा अब्दुल्ला पूर्व प्राथमिक विभाग, खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या विद्यालयाने दि. २५ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान गोवा सरकारने गोवा इंटरनॅशनल रोबोटिक फेस्टिवल-२०२४ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विद्यालया बरोबर टीम मॅट्रिक्स व टीम इनोएट या लढतीमध्ये प्रथम फेरीत गोवळकोट विद्यालयाने प्रथम फेरीत घवघवीत यश संपादन केले.

    या इंटरनॅशनल रोबोटिक स्पर्धेमध्ये तालुक्यातील गोवळकोट एजुकेशन सोसायटी संचलित, अजिजा अब्दुल्ला पूर्व प्राथमिक विभाग, खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या विद्यालयाने प्रतिनिधित्व केले. पुढीलवर्षी या विद्यालयाने आपले स्थान प्राप्त केले आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे नवीन टेक्रॉलॉजीबद्दल माहिती व्हावी व या वयातच त्यांनी यामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे, यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे गोवा सरकार हे देशातील पहिले व एकमेव शासन आहे. गेली तीन-चार वर्षे यासाठी गोवा सरकार विविध प्रयोग करत असल्याने यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून या विद्यालयाने विशेष मेहनत केली आहे. गोव्याबरोबरच शेजारील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करून दिली होती. तसेच दिव्यांग मुलांनाही नवीन टेक्नॉलॉजीची माहिती व्हावी व इतरांएवढ्याच संधी त्यांना मिळाव्यात यासाठी गोवा सरकार व इन्फिनिटी एक्स यांनी पुढाकार घेऊन गोव्यातील चार शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत रोबोटिक कीट देऊन त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

    अशाप्रकारे रोबोटिक फेस्टिवल जाहीर करून गोव्यातील विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजीबद्दल अवगत करण्यास गोवा सरकार प्रयत्नशील आहे. याची संधी साधत चिपळूणचे गोवळकोट गावाचे सुपुत्र व कोच अशफाक चौगुले यांचे विशेष योगदान आहे. गेली ६-७ महिने अमेरिका येथून ऑनलाईन झूम मीटिंग द्वारे विद्यार्थी व शिक्षक यांना रोबोटिकवर प्रशिक्षण दिले आहे. विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांना गोवा येथील आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी जाण्यासाठी स्वतः कोच म्हणून गेली १२ दिवस विद्यालयामध्ये मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. यासाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक कु. शफा सलीम चौगुले, रोहित थोरवडे, इम्रान सिंकदर महात यांनी विशेष मेहनत घेतली.

    या स्पर्धेत विद्यालयातील सहभागी विद्यार्थी कु. हुदा शोएब खतीब (कप्तान), कु. हफसा इम्रान खतीब, कु. जिक्रा जफर कटमाले, कु. कार्तिकी मनोज भैरवकर, कु.प्राजक्ता शिवाजी गोवळकर, त्यानंतर कु.जैद सुर्वे, कु. अब्दुल रेहमान मन्सूर घारे, कु. उमरखान फिरोज पठाण, आदी विद्यार्थी सहभागी होते. या स्पर्धेमध्ये देश-विदेशातून सुमारे ५९ टीम सहभागी झाल्या होत्या. लहान वयातच विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजीबद्दल इंजिनिअरसारखा विचार करावा हा फर्स्ट टेक चॅलेंज स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थी ऑटोकेंडसारख्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून प्रथमतः रोबोटचे डिझाईन बनवतात, त्यांच्या आधारे विविध इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पार्टचा वापर करून रोबोट बनवला जातो व जावा बेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून कोर्डिंग केले जाते. टीमने बनवलेल्या रोबोटच्या सहाय्याने इतर टीमशी विविध स्तरावर स्पर्धा केली जाते. एका टीममध्ये १३ ते १८ वयोगटातील जास्तीत जास्त १५ विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

    या यशाबद्दल या यशाबद्दल गोवळकोट एज्यूकेशन सोसायटीचे संस्थेचे चेअरमन डॉ. इसहाक खतीब, व्हा. चेअरमन जफर कटमाले, सेक्रेटरी मुजाहिद मेयर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरूसा खतीब, सल्लागार सौ. नादिया खतीब, मुख्याध्यापक इरफान शेख तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.