गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर खडसे संतप्त; मी त्यांच्या मुलाला आशीर्वाद दिला असता

मी गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत कधीही बोललो नाही. तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे? साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो. असे असताना निखील भाऊची हत्या झाली की आत्महत्या, असे प्रश्न विचारणे चुकीचे आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

    जळगाव – मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात राजकारणातील घराणेशाहीवरुन (Dynasticism) संघर्ष पेटला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मुलांबद्दल विधाने केली आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना एक मुलगा होता. त्याची हत्या (Murder) झाली की आत्महत्या (Suicide) केला, असे सांगितले. त्यामुळे खडसे भावूक झाले. त्यांनी महाजनांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच, महाजनांमुळे आम्हा कुटुंबियांना वेदना होत आहेत, असे ते म्हणाले.

    अत्यंत नीच आणि हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजन यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर महाजन यांची मनोवृत्ती लक्षात येते. मी गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत कधीही बोललो नाही. तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे? साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो. असे असताना निखील भाऊची हत्या झाली की आत्महत्या, असे प्रश्न विचारणे चुकीचे आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

    निखील भाऊंचा मृत्यू झाला तेव्हा मी तेथे नव्हतो. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी फक्त रक्षा खडसे होत्या. त्यामुळे महाजनांनी जे वक्तव्य केले, त्याचा अर्थ रक्षा खडसे यांच्यावर संशय आहे, असा होतो. आमच्या परिवारावर त्यांनी संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे आमच्या परिवाराला वेदना झाल्या. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे. माझ्या मित्रपरिवारातून साधारण ६० ते ७० फोन आले आहेत. त्यांनीही गिरीश महाजन यांच्या या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे, असे खडसे यांनी सांगितले.