प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल १९ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह (19 School Students Found Corona Positive ) आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनचा (Omicron) सगळीकडे वेगाने प्रसार होत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या (Omicron Patients In Maharashtra) जास्त आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. आता अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल १९ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह (19 School Students Found Corona Positive ) आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

    अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग असून ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, असेही अधिकाऱ्यांने सांगितले.

    जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की, “गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये १९ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक संक्रमित विद्यार्थ्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. काहींमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसत होती.”