कोरोनाबाबतच्या नियमांना आमदाराकडूनच केराची टोपली; थेट कोरोना वार्डमध्ये जात रुग्णासॊबत घेतला सेल्फी

महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. परंतु त्यांच्याच पक्षातील आमदार जर कोरोना वार्डात विना मास्क जाऊन अशाप्रकारे फोटोसेशन करत असतील, तर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या लवकर आटोक्यात येईल, असं दिसून येत नाही. त्यामुळे निलेश लंके यांच्यावर आता कारवाई होणार का? की, सर्व नियम हे जनतेलाच लागु आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.

    अहमदनगर: सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना खबरदारी घेण्यासाठी प्रशासन सातत्याने सूचना करत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी काल राजकीय नेतेही कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी थेट कोरोना रुग्ण भरती असलेल्या वॉर्डात जाऊन आपल्या मायबाप जनतेशी संवाद साधला. एवढच नाही तर आमदार साहेबांनी तिकडे आपल्या मोबाईलमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांसोबत सेल्फीदेखील काढला. आता हा जनतेबद्दलचा कळवळा की, प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे.

    कोरोना वार्डात पोहोचले तेव्हा त्यांच्या तोंडावर मास्कही नव्हता. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना लोकप्रतिनिधींनीच अशी केराची टोपली दाखवली, तर सर्वसामान्यांनी याचा काय आदर्श घ्यावा? हा प्रश्न पडतो.