सौताडा धबधब्यावरून उडी मारून श्रीगोंदा येथील ग्रामसेवकाची आत्महत्या

    जामखेड : जामखेडपासून दहा बारा किमी अंतरावर असलेल्या सौताडा येथील रामेश्वरच्या धबधब्यावरून खोल दरीत उडी मारून श्रीगोंदा येथील ग्रामसेवकाने आत्महत्या केली.

    मयताच्या ओळखपत्रावरुन झुंबर मारुती गवांदे (वय ५० वर्षे) ग्रामसेवक, पंचायत समिती कार्यालय, श्रीगोंदा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव समजले आहे. ही घटना आज (दि. 24) सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ही घटना कळताच पाटोदा पोलीस स्टेशनचे पीआय पाटील व सौताडा येथील ग्रामस्थ घटनास्थळी भेट दिली. यावेळी धबधब्याजवळ सदरची बॅग सापडली.

    यामध्ये एक ओळखपत्र सापडले. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली. सदर आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

    अंधार पडला असल्याने उंचावरून दगडात पडलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सकाळची वाट पाहावी लागणार असून, मृतदेह वर आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सौताड्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी गावकरी करत आहे