तांदळाच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक उलटला; एक जखमी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा (ता.संगमनेर) येथे सर्व्हिस रस्त्यावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटला. ही घटना गुरुवारी (दि.३०) रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

    संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा (ता.संगमनेर) येथे सर्व्हिस रस्त्यावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटला. ही घटना गुरुवारी (दि.३०) रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
    याबाबतची अधिक माहिती अशी की, दिल्ली येथून तांदूळ घेऊन ट्रक पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने पुणे येथे जात होता. गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा ट्रक आंबीखालसा फाट्यावर आला असता त्याचवेळी ट्रक गतिरोधकवरून सर्व्हिस रस्त्यावर उलटला. यावेळी ट्रकमधील तांदाळाच्या गोण्या बाहेर विखुरल्या होत्या. तर ट्रकचेही मोठे नुकसान होवून एकजण जखमी झाला आहे.
    दरम्यान, हा मालवाहू ट्रक महामार्गावर पलटी झाला असता तर वाहतूक ठप्प झाली असती. मात्र सर्व्हिस रस्त्यावर तो पलटी झाल्याने वाहतुकीस कोणतीही बाधा पोहोचली नाही. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या वर्षभरात या गतिरोधकवर छोट्या-मोठ्या वाहनांचे अपघात झाले आहे. अद्याप ही श्रृंखला कायम असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.