अहमदनगर रुग्णालय आग प्रकरण: वैद्यकीय अधिकाऱ्यासह, तीन परिचारिकांना अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तिघा परिचारिकांचा समावेश आहे. त्यांना आरोग्य विभागाने कालच निलंबित केलेले आहे(Ahmednagar hospital fire case: Three nurses arrested, including medical officer). तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.

    अहमदनगर : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तिघा परिचारिकांचा समावेश आहे. त्यांना आरोग्य विभागाने कालच निलंबित केलेले आहे(Ahmednagar hospital fire case: Three nurses arrested, including medical officer). तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.

    वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि चन्ना यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश कालच आरोग्य विभागाने दिला आहे. त्यानंतर आज त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली.

    सीसीटीव्ही फुटेज तपासले

    पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत गेले होते. त्याची पडताळणी यासोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब, मृत आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्यातून नावे निष्पन्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी संकलित केलेल्या पुराव्यात नावे निष्पन्न झाल्याने मंगळवारी सायंकाळी यातील चौघांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या घटनेचा तपास करीत आहेत.