अकोलेचे जेष्ठ नेते मधुकर नवले व मीनानाथ पांडे यांचा सहकार्‍यांसोबत आज काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोले : अकोले तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते मधुकरराव नवले व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी सहकार्‍यांसोबत आज आपल्या सहकाऱ्यांसह महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मुंबई येथे गांधी भवनात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

अकोले : अकोले तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते मधुकर नवले व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी सहकार्‍यांसोबत आज आपल्या सहकाऱ्यांसह महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मुंबई येथे गांधी भवनात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची भूमिका निभावणारे २०१६ पासुन काँग्रेस पक्षापासून दूर झालेले ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले अखेर असंख्य कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले. नुकताच मुंबई येथे गांधी भवनात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तसेच अगस्ती एज्युकेशनचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेले मीनानाथ पांडे, एकवीस वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून तसेच विविध शेतकरी संघटनेत विशेष योगदान असलेले रमेश जगताप , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे राज्य सचिव व आदिवासी युवकांचे नेतृत्व करणारे मदन पथवे, भास्करराव दराडे , सावरगावचे विद्यमान सरपंच रमेश पवार ,एकनाथ सहाणे व ज्येष्ठ नेते पाटीलबुवा सावंत यांनीदेखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या समारंभास महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात, आ. सुधिर तांबे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन ,प्रदेश काँग्रेसचे महासचिव मोहनदादा जोशी, राजाराम देशमुख , प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे ,महिला काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते,अ नगर जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे ,जिल्हा सेक्रेटरी शिवाजी नेहे, सहसेक्रेटरी अरिफ तांबोळी,तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे , अॅड के बी हांडे शंकरराव वाळूज,संपतराव कानवडेउपस्थित होते.

मधुकरराव नवले यांनी यावेळी श्रद्धेय भाऊसाहेब थोरात हेच आमचे विद्यापीठ असून ना. थोरात साहेबांसोबत यापूर्वीही काम केलेले असल्यामुळे स्वगृही परतण्याचा आनंद झाल्याची भावना व्यक्त केली .यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये अकोले तालुका पुरोगामी विचारांचा तालुका असून स्वातंत्र्याची चळवळ येथे रुजली वाढलेली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्व ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे स्वागत करून संघटनात्मक ताकद देणार असल्याचे मत व्यक्त केले. मधुकरराव नवले मीनानाथ पांडे हे राज्यपातळीवरील नेते असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.