संगमनेर शहरवासियांत महावितरणबाबत तीव्र संताप

संगमनेर : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार काही थांबण्याचे नाव घेईना. वाढीव बिले, मीटर बदली आणि खेळखंडोबा आदी समस्यांनी संगमनेर शहरवासिय अक्षरशः त्रस्त झाले आहेत. यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहरातील रहेमतनगर, आकार कॉलनी, एकता नगर, जोर्वे रस्ता आदी परिसरात सकाळी ८ ते १२ आणि दुपारी १ ते ३ दरम्यान वीजेचा लपंडाव सुरू असतो. त्यातही कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वीजेवरील उपकरणांचे नुकसान होत आहे. येथील रोहित्राबाबतही अनेकदा तक्रारी करुन मार्ग निघत नसल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढला नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.