‘अशोक’च्या निवडणुकीत अनुराधा आदिकांची एन्ट्री; मुरकुटेंच्या विरोधात शेतकरी पॅनेलचा करणार प्रचार

शेतकरी संघटनेच्या उमेदवार प्रचारासाठी स्व. खासदार गोविंदराव आदिक यांच्या कन्या, साईबाबा संस्थानच्या विश्वस्त व श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Anuradha Adik) यांनी एन्ट्री केल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

    श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या १६ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शेतकरी संघटनेच्या उमेदवार प्रचारासाठी स्व. खासदार गोविंदराव आदिक यांच्या कन्या, साईबाबा संस्थानच्या विश्वस्त व श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Anuradha Adik) यांनी एन्ट्री केल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

    उक्कलगाव, एकलहरे व टाकळीभान येथील सभासद मतदारांच्या गाठीभेटी दौरा नगराध्यक्षा आदिक यांनी करून त्या प्रगतिशील शेतकरी भास्करराव कोकणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानदेव थोरात, जितेंद्र भोसले, महिला शहराध्यक्ष अर्चना पानसरे, भगीरथ जाधव, विष्णुपंत खंडागळे, रईस जाहगीरदार, राजेंद्र पानसरे, देविदास कोकणे, जयकर मगर उपस्थित होते.

    अशोकच्या निवडणुकीत आपण सक्रिय असल्याचे सांगून स्व. खासदार आदिक यांची पुण्याई व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या आशीर्वादाने आपण पाच वर्षे श्रीरामपूर नगराध्यक्षपदाचा जनसेवेसाठी उपयोग केला. त्याच पद्धतीने अशोकच्या शेतकरी सभासदांच्या न्याय हक्कासाठी कार्यक्षेत्रात असलेल्या पाचही गटातील सभासदांच्या गाठीभेटी घेऊन मतदार संघ पिंजून काढू.

    – अनुराधा आदिक, नगराध्यक्ष.