‘तिरुपती’च्या सदस्यपदी नगरचे उद्योजक सौरभ बोरा यांची नियुक्ती

देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्ष व २८ सदस्यांची घोषणा आंध्रप्रदेश सरकारने नुकतीच केली.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्ष व २८ सदस्यांची घोषणा आंध्रप्रदेश सरकारने नुकतीच केली. नूतन कार्यकारिणीत नगरचे सुपुत्र व उद्योजक सौरभ बोरा (Saurabh Bora) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    सौरभ बोरा हे तिरुपती बालाजी भागवंताचे नित्सिम भक्त आहेत. ते सध्या मुंबई येथे स्थायिक आहेत. त्यांचा विविध सामाजिक कामात सतत सहभाग असतो. देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नगरच्या सौरभ बोरा यांना सदस्य होण्याचा मान मिळाला आहे.

    मर्चंट बँकेचे संस्थापक स्व. हेमराज बोरा व विद्यमान संचालिका प्रमिला बोरा यांचे सौरभ चिरंजीव आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या सदस्यपदी निवड झाल्याची बातमी नगर पोहचल्यावर त्यांच्यावर मित्रमंडळींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.