जामखेडच्या तहसीलदारपदी योगेश चंद्रे यांची नियुक्ती

    जामखेड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेडच्या तहसीलदारपदी योगेश चंद्रे (Yogesh Chandre) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या बदलीमुळे हे पद रिक्त झाले होते. जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य जनताची कामे करणे हे तहसीलदार चंद्रे यांच्यापुढील आव्हान नसून तहसील कार्यालय व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभातील कर्मचाऱ्यांमधील क्रियाशीलता कार्यान्वित करणे हे आव्हान त्यांना पार पाडावे लागेल.

    याबरोबरच गौण खणीज, खडी क्रेशर,वसूलीचे उद्दिष्ट अशा बाबींकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. याबरोबरच काही तलाठी सजा व मंडल अधिकारी यांच्या कार्यशैलीमध्येही जाणीवपूर्वक बदल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जामखेडची जनता व शेतकरी सोशिक असल्याने कोणी तक्रार करण्यास समोर येत नाही. मात्र, कामांबाबत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतात.

    एकंदरच ग्रामविकास तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हाती घेतलेल्या सप्तपदी अभियान राबविण्यात दिलेल्या माहितीनुसार कामे झाल्यास सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींंपासून सुटका मिळेल. नवीन तहसीलदार योगेशजी चंद्रे यांनी कोपरगाव येथे केलेले काम पाहता त्यांच्याकडून अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही. कारण ते एक शिस्तप्रिय व कार्यकुशल व कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे नेहमीच दिसून आले आहे.