दुर्गा तांबेंना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान

संगमनेर : संगमनेरच्या नगराध्यक्षा व जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गा तांबे यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून पर्यावरण, महिला सबलीकरण, समाजकारण, शिक्षण आधुनिकीकरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संगमनेर : संगमनेरच्या नगराध्यक्षा व जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गा तांबे यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून पर्यावरण, महिला सबलीकरण, समाजकारण, शिक्षण आधुनिकीकरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय निसर्ग मित्र समिती व ग्रामपंचायत टेंभे यांच्या वतीने कै. बापूसाहेब चिला शिवबा अहिरे यांच्या स्मरणार्थ टेंभे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, साहित्यिक कवी सुभाष सोनवणे, अतुल निकम, सरपंच भाऊसाहेब अहिरे, विश्वासराव पगार, निर्मला गुंजाळ उपस्थित होते.

दुर्गा तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून खेडोपाडी, गावोगावी महिलांचे संघटन करुन महिला सबलीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, चर्चासत्रे, मार्गदर्शन, सहलींबरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानात प्रकल्प प्रमुख म्हणून महत्वाची भूमिका सांभाळली. संगमनेर शहरासाठी स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर, सुंदर संगमनेर यासह विकासाच्या अनेक योजना राबविल्या. सामाजिक क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे.