अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार; राज्याचे निधी संकलन अभियान प्रमुख शंकर गायकर यांची माहिती

अकोले : अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री व राज्याचे निधी संकलन अभियान प्रमुख शंकर गायकर यांनी अकोले(जि.नगर)तालुक्यातील कोतुळ येथील भेटीत दिली.

अकोले : अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री व राज्याचे निधी संकलन अभियान प्रमुख शंकर गायकर यांनी अकोले(जि.नगर)तालुक्यातील कोतुळ येथील भेटीत दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना गायकर यांनी सांगितले की,संपूर्ण जगाने अभिमानाने व श्रद्धेने माथा टेकवावा असे प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्या येथे संपूर्ण जगभरातील व देशातील राम भक्तांच्या लोक वर्गणीतून उभे राहणार आहे.शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम जन्मभूमी मुक्त झाली असून त्या जागेवर मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.हे मंदिर लोक सहभागातून व लोक वर्गणीतून बांधले जाणार असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागातून श्री राम मंदिर निधी समर्पण समितीची स्थापन करण्यात आली असून श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरिजी महाराज या समितीचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी स्वामी नरेंद्राचार्य महाराज नाणीज,महंत भास्करगिरी महाराज देवगड ,श्री देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज,पद्मविभूषण डॉ.अशोक कुकडे लातूर, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत,पद्मश्री मिलिंद कांबळे,अभिनेता अरुण नलावडे,सामजिक कार्यकर्ते ठमाताई पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख धर्माचार्य,सामाजिक,कला,साहित्य,

सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यात सहभागी झालेले आहेत.त्यात प्रामुख्याने करवीर पिठाचे शंकराचार्य,शांतीगिरीजी महाराज,शिवाजी महाराज मोरे,रामराव महाराज ढोक,मोहनबुवा रामदासी,चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या सह अभिनेते नितीन भारद्वाज,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,पंडित हृदयनाथ मंगेशकर,सुरेश वाडकर,श्रीमंत मुधोजी राजे भोसले,हरविंदसिंग बिंद्रा यांच्या सह ८८ मान्यवर या समिती मध्ये सहभागी झालेले आहेत.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचा आराखडा मोठा असून त्यानुसार सर्व तयारी झाली आहे.श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची लांबी ३६० फूट,रुंदी २३५ फूट,उंची २६१ फूट असून जमिनीखाली खोल २०० फूट मातीच्या विविध चाचण्या करण्यात आलेल्या असून भविष्यातील संभाव्य भूकंपांच्या परिणामाचा अभ्यास केला गेला आहे.जमिनीच्या खाली २०० फुटांपर्यंत वाळू कोसळत आहे, गर्भगृहात काही अंतरावर शरयू नदी वाहते. या भौगोलिक परिस्थितीत १००० वर्ष जुन्या दगडी मंदिराचे वजन सहन करू शकतील अशा मजबूत आणि टिकाऊ पायाच्या रेखांकनावर आयआयटी मुंबई , आयआयटी दिल्ली, आयआयटी चेन्नई, आयआयटी गुवाहाटी, केंद्रीय इमारत संशोधन संस्था रुड़की,या संस्था परीक्षण करीत असून मंदिराचे बांधकाम लार्सन अँड टुब्रो हि बांधकाम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणारी कंपनी करणार असून टाटा कन्सल्टिंग चे अभियंता तांत्रिक सल्ला देणार आहेत. सोमनाथ मंदिराचा आराखडा तयार करणारे प्रसिद्ध वास्तू रचनाकार चंद्रकांत भाई सोमपुरा हे मंदिराचा आराखडा तयार केला आहे असे गायकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, ऐतिहासिक अशा राम मंदिर जन्मभूमीचा इतिहास सध्याच्या युवापिढी पर्यंत पोहचावा यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राज्यभर घराघरात पोहचणार आहेत.राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र उभारण्यासाठी लाखो भाविकांनी कष्ट घेतलेले आहेत.त्याचप्रमाणे राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र उभारण्यासाठी लक्षावधी लोक स्वेच्छेने लोकवर्गणी देतील असा विश्वास शंकर गायकर यांनी व्यक्त केला.यासाठी कोणावरही सक्ती केली जाणार नाही.दहा रुपयापासून निधी स्वीकारला जाणार असून त्यात पारदर्शकता राहण्यासाठी निधी देणा-याला कुपन किंवा पावती देण्यात येईल.त्याच बरोबर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे संकल्पचित्र देण्यात येईल.हे निधी संकलन अभियान मकरसंक्रांतीपासून प्रत्यक्ष सुरु होऊन माघ पौर्णिमेला संपेल व या दरम्यान चार लाख कार्यकर्ते घरोघरी जाऊन हा स्वेच्छा निधी स्विकारणार आहेत.

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी सरकारकडे निधी मागितला जाणार नसून संपूर्ण मंदिर भाविकांच्या स्वेच्छा निधीतूनच उभे राहील असा विश्वास गायकर यांनी व्यक्त केला.कोतुळ येथील भेटीत शंकर गायकर यांचा श्री वरदविनायक देवस्थान ट्रष्टच्या वतीने श्री वरदविनायकाची प्रतिमा भेट देऊन अध्यक्ष प्रदीप भाटे , ट्रस्ट सदस्य व कुटुंबीयांनी सत्कार केला.