अकोले तालुक्यातील सुगाव फाटा येथे १० ते १२ एकर ऊस जळून खाक

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या आग अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला.त्या बंबद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता तसेच या आगीची तीव्रताही प्रचंड असल्याने सुमारे १० ते १२ एकर ऊस या आगीने आपल्या कवेत घेतला आणि जळून खाक झाला.

    अकोले : ऊसाला अचानक लागलेल्या आगीत सुमारे १० ते १२ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना अकोले तालुक्यातील सुगाव फाटा परिसरात घडली. ही आग आज दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान लागली.वाऱ्याचा जोर आणि आगीचा लोट एवढा मोठा होता की जवळ जवळ लागून असलेल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा ऊस या आगीच्या लपेटात येऊन जळून गेला.ही आग लागल्याचे निदर्शनास येताच अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या आग अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला.त्या बंबद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता तसेच या आगीची तीव्रताही प्रचंड असल्याने सुमारे १० ते १२ एकर ऊस या आगीने आपल्या कवेत घेतला आणि जळून खाक झाला.यामध्ये काही एकर ऊस हा तोडणीच्या प्रतीक्षेत होता तर काही सहा महिन्यांचा होता त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार या ऊस जळीतामध्ये विराज रामनाथ शिंदे,सुनील गंगाधर देशमुख,रमेश गंगाधर देशमुख,अशोक त्र्यम्बक देशमुख,नारायण शांताराम देशमुख,नितेश तान्हाजी देशमुख,विजय पंढरीनाथ देशमुख,विलास निवृत्ती देशमुख आदीं शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.या आगीची झळ या ऊसाच्या शेताला लागूनच असलेल्या चारा पिकांना व शेतातील कांदा पिकालाही बसली.ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.आग एवढी प्रचंड होती की डोळ्यादेखत ऊस जळत असताना केवळ त्याकडे हातबल होऊन पाहण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिले नव्हते.