पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली ‘अशी’ घटना…

दुचाकी पूर्णत: जळून गेल्या असून, कारचा मागील भाग हा निम्मा जळाला आहे. यापूवीर्ही अशा पद्धतीच्या घटना शहरात घडल्या आहेत. दिवसेंदिवस संगमनेर शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे.

    संगमनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संगमनेर शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका ठिकाणी अज्ञात इसमाने दोन दुचाकीसह एक कारला आग (Car Fire) लावली. त्यात तिन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. रविवारी (दि.२६) पहाटे ही घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीसांनी असे जाळपोळ करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे आली आहे.

    संगमनेर शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरच भाजपचे संपत गलांडे राहतात. त्यांच्या घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी व एक कारला रविवारी पहाटे अज्ञात आग लावली. त्यात दुचाकीसह एक कार जाळून खाक झाली. घटनेची माहिती समजताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    गुन्हेगारीचा आलेख वाढतोय

    दरम्यान, दुचाकी पूर्णत: जळून गेल्या असून, कारचा मागील भाग हा निम्मा जळाला आहे. यापूवीर्ही अशा पद्धतीच्या घटना शहरात घडल्या आहेत. दिवसेंदिवस संगमनेर शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे.