चंदुकाका सराफ अँड सन्स् प्रा. लि.च्या अहमदनगर सुवर्ण दालनाचा ११ जानेवारीला भव्य शुभारंभ

बारामतीची एकमेव सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्ण पेढीने अत्यंत जबरदस्त ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगरवासियांना केले आहे.

  अहमदनगर : गोदावरी, प्रवरा, भीमा, सीना या नद्यांनी सुजलाम-सुफलाम झालेल्या व श्री साई बाबा, श्री शनिदेव यांच्या मंदिरांनी पवित्र अशा अर्थ, उद्योग, सहकार, लष्करी सामर्थ्य, शैक्षणिक क्षेत्रात सर्वात अग्रेसर असणाऱ्या अहमदनगरवासियांच्या सेवेत बारामतीचे शुध्द सोने हे ब्रीद असलेले व गेली 195 वर्षे शुध्दता, परंपरा, विश्वास, पारदर्शकता आणि नाविन्यता या पंचसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या प्रसिद्ध चंदुकाका सराफ अँड सन्स् प्रा. लि. (Chandukaka Saraf and Sons) च्या 20 व्या सुवर्ण दालनाचा अहमदनगर येथे भव्य शुभारंभ मंगळवारी (दि.11) सकाळी 11 वाजता होणार आहे.

  हा कार्यक्रम आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते व विधानसभा सदस्य संग्राम जगताप, अहदमदनगरच्या महापैार रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा, संचालक श्री अतुलकुमार जिनदत्त शहा, श्री सिध्दार्थ अतुलकुमार शहा, आदित्य अतुलकुमार शहा, सम्यक किशोरकुमार शहा, नेहा शहा, संगिता शहा, अंकीता शहा व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. अहमदनगर शाखा नेवासकर पेट्रोल पंप शेजारी, सथ्था कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर येथे संपन्न होत आहे.

  या निमित्ताने बारामतीची एकमेव सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्ण पेढीने अत्यंत जबरदस्त ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगरवासियांना केले आहे. उद्घाटनानिमित्त दर दोन तासांनी अशी एकूण 30 भव्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये रू. 12,900/-च्या पुढील दागिने खरेदीवर व रू. 3,000/- च्या पुढील गोल्ड ट्री प्लस / कल्पतरू योजनेतील गुंतवणूकीवर कूपन द्वारे भेट वस्तू मिळण्याची सुवर्णसंधी आहे. यामधून मेगा प्राईज म्हणून एका भाग्यवान ग्राहकाला टू व्हिलर मिळणार असून बंपर प्राईजेस 6 लॅपटॉप, 6 टॅब व असंख्य गिफ्ट व्हाऊचर्स अशी आकर्षक पर्वणी राहणार आहे.

  समृध्दता, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सहकार, धार्मिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरात सुरू होणारी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. ची ही विसावी शाखा आहे. बारामतीचे शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी अशी ठळक वैशिष्ट्ये असणाऱ्या या पेढीची मुहूर्तमेढ रोवली.

  स्वर्गीय श्रीमानशेठ चंदुलाल जोतीचंद शहा यांच्या वडिलांनी स्वर्गीय श्रीमानशेठ जोतीचंद भाईचंद शहा यांनी 18 व्या शतकात, सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये या पेढीच्या गौरवशाली परंपरेचा जो भक्कम पाया त्यांनी रचला. त्या जोरावरच ही पेढी आजही यशस्वी निरंतर वाटचाल करत आहे. एका दुकानापासून सुरु झालेला हा प्रवास आता दोन राज्ये, 10 शहरं व 20 दिमाखदार सुवर्ण दालनांपर्यंत पोहोचला आहे. लवकरच अहमदनगर शाखेमध्ये वेडिंग डेस्टीनेशन ज्वेलरी या लग्नाकरिता परिपूर्ण अशा दागिन्यांचे प्रशस्त स्वतंत्र दालन साकारले जाणार आहे.

  समृध्द आणि सुजलाम-सुफलाम अहदमनगर शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून शुध्दता आणि कलात्मकतेचा वारसा घेऊन बारामतीचे एकमेव सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. आता अहमदनगरवासियांच्या सेवेत रूजू होत आहेत. अहमदनगरवासियांचे व आमचे अतूट नाते निर्माण होईल असा विश्वास चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे किशोरकुमार शहा व अतुलकुमार शहा यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त अहमदनगरवासियांनी घ्यावा असे आवाहन संचालक सिध्दार्थ शहा यांनी केले आहे.

  दरम्यान, राज्य व केंद्र सरकारने दिलेले कोविडचे सर्व प्रतिबंधात्मक नियम व अटी पाळून सदर उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.