चक्क कारागृहातच कैद्यात ‘फ्री स्टाईल’

दुय्यम कारागृहात कैद्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यात नगर येथील कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    कोपरगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येथील दुय्यम कारागृहात कैद्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यात नगर येथील कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहरूख सत्तार खान (रा. नवनागापूर, नगर) असे जखमी कैद्याचे नाव आहे.
    अक्षय थोरात ऊर्फ बजरंग आणि रोहित खरात अशी मारहाण करणाऱ्या दोघा कैद्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यात अटकेत असलेल्या कैद्यांना कोपरगावच्या दुय्यम कारागृहात ठेवले जाते. शुक्रवारी रात्री खरात व थोरात या दोघांनी खान यास शिवीगाळ करत फाईटने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर खान याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.