नेवासा तालुक्याच्या विकासासाठी कटीबध्द : मंत्री शंकरराव गडाख

नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथे रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गडाख बोलत होते.यावेळी तालुक्यातील माका ते वाघोली वस्ती रस्ता,चांदा ते दहातोंडे वस्ती रस्ता,भानसहिवरे ते मारूती तळे रस्ता,कौठा ते महालक्ष्मी हिवरे रस्ता आदी रस्त्याच्या मजबुतीकरण व डाबरीकरण कामाच्या भुमीपुजन मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

    नेवासा : नेवासा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असुन कामे टप्प्या-टप्प्याने कामे करणार असुन कामेही दर्जेदारच होतिल.असा विश्वास मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला.रस्त्यांची कामे सुरू असतानाच त्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे.दर्जेदार कामासाठी वेळ प्रसंगी कार्यकर्त्याने स्वतः वाईटपणा घेतला पाहिजे अथवा मला कळवले पाहिजे.
    रस्त्यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा व निकृष्ठपणा खपवून घेतला जाणार नाही ,असा सूचक इशाराही मंत्री गडाख यांनी ठेकेदारांना दिला.

    नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथे रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गडाख बोलत होते.यावेळी तालुक्यातील माका ते वाघोली वस्ती रस्ता,चांदा ते दहातोंडे वस्ती रस्ता,भानसहिवरे ते मारूती तळे रस्ता,कौठा ते महालक्ष्मी हिवरे रस्ता आदी रस्त्याच्या मजबुतीकरण व डाबरीकरण कामाच्या भुमीपुजन मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे,उद्योजक शिवाजीराव पाठक, बाबूराव चावरे, सोसायटीचे अध्यक्ष भागचंद चावरे,माजी सरपंच अॅड.बन्शी सातपुते,भागचंद महाराज पाठक, सरपंच वनमाला चावरे, उपसरपंच सौ.सोनल जाधव,ब-हाणपुरचे सरपंच शंकर चव्हाण,गणपत चव्हाण , चांदा येथे कारभारी जावळे,अनिल अडसुरे,भानसहिवरे येथे उपसभापती किशोर जोजार,
    बाळासाहेब भणगे,उपसरपंच अय्याज देशमुख,कौठा येथे सरपंच मच्छिद्र डाके,उपसरपंच जनार्धन चक्रनारायण,डॉ अमृत काळे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.