श्री क्षेत्र म्हाळादेवी येथे हरिनाम सप्ताहाची सांगता

अकोले : तालुक्यातील श्री क्षेत्र म्हाळादेवी येथे चंपाषष्ठीच्या निमित्ताने सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची आज ह.भ.प.डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. या सप्ताह काळात सर्व शासकीय नियम पाळून दररोज काकडा , हरिपाठ त्याचबरोबर भजन ही सर्व कार्यक्रम या ठिकाणी नियमानुसार करण्यात आले. चंपाषष्ठी च्या दिवशी परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात दिवस कीर्तन महोत्सव व अन्नदान हे कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. परंतु काल्याच्यl  कीर्तनाच्या दिवशी गावातील प्रगतशील शेतकरी अशोक पुंजा हासे यांनी महाप्रसादाची पंगत दिली. कोरोनाच्या संकटातही भाविकांनी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळीत चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.या सर्व सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी अतिशय काळजीपूर्वक परिश्रम  घेतले.