मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा काँग्रेस करणार पर्दाफाश

    शिर्डी : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज राहाता तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, N.S.U.I, अल्पसंख्याक सेल यांच्या वतीने गरजूंना रेशन वाटप करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार राबवत असलेल्या चुकीच्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी व गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी, कामगारांच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प करण्यात आला. आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसच्या वतीने संकल्प दिन म्हणून साजरा केला गेला.

    देशाचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त राहता येथील काँग्रेस कार्यालयात युवक काँग्रेसच्या प्रियंका सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.  प्रियंका सानप यांनी स्वतःचे उदाहरण देत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा योग्य सन्मान केला जातो. मी तळागाळात जाऊन केलेल्या कार्याची दखल घेत खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली, अशा भावना व्यक्त करत आपण सर्वांनी जोमाने कामाला लागत देशाच्या पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना विराजमान करण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून संघटन बळकट करावे, अशा सूचना केल्या.

    यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ गोंदकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जि. कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, जि.उपाध्यक्ष ऍड.पंकज लोंढे, तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, सेवादल तालुकाध्यक्ष रमेश गागरे, ता उपाध्यक्ष सुभाष निर्मळ, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र निर्मळ, भास्करराव फणसे, बाळासाहेब खर्डे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.