अकलापूर येथे दत्त जयंती साध्या पद्धतीने साजरी ;  मंदिरात फुलांची सजावट 

संगमनेर :  संगमनेर तालुक्यासह पठार भागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकलापूर येथील स्वयंभू दत्त महाराजांचा जयंती सोहळा या वर्षी म्हणजे मंगळवार दिनांक २९ डिसेंबर रोजी कोरोना प्रादुर्भावामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. 

अकलापुर येथे भव्य दिव्य असे दत्त महाराजांचे स्वयंभू देवस्थान आहे दरवर्षी याठिकाणी दत्त जयंती निमित्ताने  हजारो भाविक येऊन दर्शन घेत असतात पुणे, मुंबई, नगर, नाशिक, आदि वेगवेगळ्या ठिकाणावरून भावीक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे पठार भागातील सर्वात मोठे देवस्थान म्हणून ओळखले जाते व मंदिर परीसर हा संपुर्ण दत्त नामाने दुमदुमून जात असतो व परीसरात मोठे याञेचे स्वरुप आलेले असते परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन व देवस्थान कमीटिची बैठक काही दिवसांन पूर्वी झाली होती व या बैठकीत यावर्षीचा मंगळवार दिनांक २९ डिसेंबर रोजी होणारा दत्त जयंती सोहळा कोरोना मुळे साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले होते म्हणुन या वर्षी याञा न भरवता भावीकांसाठी सोशल डिस्टनचे नियम पाळून व सॅनिटायझर वापर करत भाविक दर्शन करून निघून जात होते तर इतर बाकीच्या सर्व कार्यक्रमांना फाटा दिला असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे त्याच बरोबर मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावटही  करण्यात आली होती.