अशोक साखर कामागार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दोंड; तर उपाध्यक्षपदी जाधव बिनविरोध

अशोक सहकारी साखर कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब विठ्ठल दोंड तर उपाध्यक्ष पदावर संतोष दामोधर जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. नूतन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात दोंड व जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब विठ्ठल दोंड तर उपाध्यक्ष पदावर संतोष दामोधर जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. नूतन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात दोंड व जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    या बैठकीला संचालक मडळाचे सदस्य लव शिंदे, निलेश गाडे, अण्णासाहेब वाकडे, डॉ.मंगेश उंडे, हरिभाऊ गायके, अशोक पारखे, ज्ञानेश्वर मुठे, भाऊसाहेब आसने, प्रदीप शिंदे, दत्तात्रय झुराळे, विकास कहांडळ, वंदना निकाळजे, लिलाबाई बागडे आदी उपस्थित होते.
    निवडीनंतर नूतन पदाधिका-यांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ व उपस्थितांनी केला. यावेळी माजी चेअरमन सोपानराव राऊत, काशिनाथ गोराणे, कामगार संचालक गोरख चिडे, कार्यालय अधिक्षक अप्पासाहेब दुशिंग, विश्वनाथ लवांडे, कृष्णकांत सोनटक्के, बाळासाहेब जाधव, आशिष दोंड, अमोल पटारे, युनूस शेख, रमेश जगताप, गोरख लवांडे आदी उपस्थित होते.
    नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब थोरात, उपाध्यक्ष दिगंबर शिंदे, युवक नेते सिध्दार्थ मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींनी अभिनंदन केले.