वटपौर्णिमेचे साधले औचित्य! नगरमधील डॉ. आदिती पानसंबळ यांचा नऊवारी साडीत एक्सरसाईज

  अहमदनगर : वटपौर्णिमा या पारंपरिक सणाचे औचित्य साधून नगरमधील आहारतज्ञ (डायटीशन) डॉ. आदिती पानसंबळ यांनी नऊवारी साडीत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज केला. याबाबतचा त्यांचा एक व्हिडिओ आज चांगलाच व्हायरल झाला असून, डॉ. आदिती यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  वटपौर्णिमा तसा एक पौराणिक कथा असलेला एक पारंपरिक सण. या दिवशी लग्न झालेल्या महिला शक्यतो नऊवारीत सजून-धजून वडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला दोरा बांधून दजसह सात फेरे मारले जातात आणि आपल्या सौभाग्याला उत्तम आरोग्य मिळावे आणि पुढील सातही जन्मी हाच जोडीदार मिळावा, अशी मागणी करतात.

  डॉ. आदिती यांनी मात्र महिलांना सदृढ आणि निरोगी जीवनासाठी व्यायाम गरजेचा असल्याचा संदेश महिलांना देण्याकरीता हा उपक्रम राबविला आहे. महिलांना घरामधील अनेक कामे करावी लागतात. तसेच अनेक महिला या नोकरी आदी क्षेत्रात व्यस्त असतात. यात महिलांना घर आणि नोकरी-व्यवसाय सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, यात त्यांच्या आरोग्याची मोठी हानी होते आणि अनेक विकार-व्याधींना महिलांना अकाली सामोरे जावे लागते.

  घर आणि नोकरी सांभाळताना पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम हा गरजेचा असतो. मात्र, नेमके त्याकडेच महिला वर्गाचे दुर्लक्ष दिसून येते. सदृढ आणि निरोगी जीवनासाठी व्यायाम गरजेचा असल्याचे डॉ. आदिती पानसंबळ यांनी सांगितले.

  महिलांना घरामधील अनेक कामे करावी लागतात. तसेच अनेक महिला या नोकरी आदी क्षेत्रात व्यस्त असतात. यात महिलांना घर आणि नोकरी-व्यवसाय सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, यात त्यांच्या आरोग्याची मोठी हानी होते आणि अनेक विकार-व्याधींना महिलांना अकाली सामोरे जावे लागते. महिलांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. ड्रेस हा विषय नाही. तेच सांगण्याचा प्रयत्न डॉ. पानसंबळ यांनी केला आहे.

  घर आणि नोकरी सांभाळताना पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम हा गरजेचा असतो. मात्र, नेमके त्याकडेच महिला वर्गाचे दुर्लक्ष दिसून येते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपली परंपरा आणि व्यायामाचे महत्व याची जाणीव महिला वर्गात व्हावी, म्हणून पारंपरिक नऊवारी साडीत जिममध्ये विविध व्यायाम अर्थात जिम एक्सरसाईज केलं.

  – डॉ. आदिती पानसंबळ