प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वसंत फुलमाळी, संदिप वसंत चव्हाण आणि कैलास नारायण पवार असे अटक केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तिघेही पोलीस शेवगावचे डीवायएसपी सुदर्शन मुंडे यांच्या पथकात कार्यरत होते. ३ मे २०२१ रोजी या तिघांनी वाळुची ट्रक चालू देण्यासाठी वाळू व्यवसायिकाकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती

    अहमदनगर : वाळू व्यवसायाकडे लाच मागणार्‍या डीवायएसपी च्या पथकातील तिघे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आज शरण आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली असून आरोपी तिघा पोलिसांना २४ जून पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

    वसंत फुलमाळी, संदिप वसंत चव्हाण आणि कैलास नारायण पवार असे अटक केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तिघेही पोलीस शेवगावचे डीवायएसपी सुदर्शन मुंडे यांच्या पथकात कार्यरत होते. ३ मे २०२१ रोजी या तिघांनी वाळुची ट्रक चालू देण्यासाठी वाळू व्यवसायिकाकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. वाळू व्यवसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून लाच मागणीचा गुन्हा या तिघा विरोधात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी असलेले तिघेही पोलीस फरार झाले होते. नगर जिल्हा न्यायालयाने तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तिघा पोलिसांच्या अटकेसाठी त्यांच्या मागावर होते. काल रात्री आरोपी असलेले तिघेही पोलीस स्वतःहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात समोर शरण आले. तिघांना अटक करण्यात करत आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विशेष सत्र न्यायाधीश कुरतडीकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत या तिघाही पोलिसांना २४ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.