हाच तो गोमांस घेवून जाणारा आयशर टेंम्पो
हाच तो गोमांस घेवून जाणारा आयशर टेंम्पो

गोमांस घेवून जाणारा आयशर टेंम्पो संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर तालुका पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई आज रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास केली आहे. एकूण आठ लाख पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

संगमनेर (Sangamaner).  गोमांस घेवून जाणारा आयशर टेंम्पो संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर तालुका पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई आज रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास केली आहे. एकूण आठ लाख पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथा मनोहर रसाळ (रा.उमरवाडी सहारा झोपडपट्टी, मानखुर्द मुंबई) हा आयशर टेंम्पो क्रमांक एमएच  ०३ सी.पी ८८५८ याच्यामधून चार लाख रूपये किंमतीचे चारशे किलो गोमांस घेवून संगमनेर कडून पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना समजली होती. त्यामुळे त्यांच्यासह पोलिस नाईक आण्णासाहेब दातीर, यमना जाधव यांनी रविवारी पहाटे हा आयशर टेंम्पो हिवरगाव पावसा टोलनाक्यावर पकडला. त्यामध्ये चार लाख रूपये किंमतीचे अंदाजे चारशे किलो गोमांस व साडेचार लाख रूपये किंमतीचा आयशर टेंम्पो असा एकूण आठ लाख पन्नास हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या प्रकरणी पोलिस नाईक यमना जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी नाथा मनोहर रसाळ याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १५४३/ २०२० भादवि कलम २६९,४२९ सह महा.प्राणी संरक्षण अधि .१९१५ चे सुधारीत २०१५ चे  क. ५ ( क) ,९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकाॅन्सटेबल सतीश पाटोळे हे करत आहे.