पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे १० दिवसांच्या आत बुजवा  ; युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने टोल बंद आंदोलनाचा इशारा

संगमनेर : पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हे खड्डे १० दिवसांच्या आत बुजविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व संगमनेर तालुका एनएसयूआय यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

संगमनेर : पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हे खड्डे १० दिवसांच्या आत बुजविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व संगमनेर तालुका एनएसयूआय यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

हिवरगाव पावसा येथील टोल कंपनी आय एल एफ एस यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी युवक काँग्रेसचे सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे,सुभाष सांगळे,निखील पापडेजा, एनएसयुआयचे अध्यक्ष गौरव डोंगरे,सचिन खेमनर,नगरसेवक नितीन अभंग,शैलेश कलंत्री, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे, हैदर अली सय्यद,शेखर सोसे, हर्षल रहाणे,सिध्देश घाडगे,सागर कानकाटे,रोहित वाळके,शहेबाज शेख यांसह विविध युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे कि,  नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर कर्‍हे घाट ते बोटा खिंड परिसरात सतत पडत असणार्‍या पावसामुळे अनेक खड्डे पडले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्याांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनावश्यक बाभळी काढणे,बोटा,अकोले नाका,साकूर फाटा,माझे घर हौसींग सोसायटी घुलेवाडी या ठिकाणी सर्व्हिस रोड तयार करावे,स्ट्रीट लाईट दुरुस्त कराव्यात तसेच टोलवर स्थानिक भुमिपुत्रांना कामावर घेण्यात यावे. कर्मचार्‍यांची पगार वाढ करावी अशा विविध मागण्या केल्या आहेत.

या सर्व परिस्थितीचा विचार करता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कर्‍हे घाट ते बोटा खिंड परिसरातील खड्डे १० दिवसाच्या आत दुरुस्त करावेत व रस्त्यांची चांगल्या प्रकारे डागडुजी करावी याबाबत मा.जिल्हाधिकारी यांना लोकप्रतिनिधी,राष्ट्रीय महामार्ग वरिष्ठ अधिकारी व टोल व्यवस्थापन यांची बैठक करणेबाबत ही निवेदन देण्यात आले आहे. जर रस्त्यांचे काम व दुरुस्ती न झाल्यास १० दिवसानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने टोल प्रशासनाला देण्यात आला आहे.