आमदार तांबे यांना साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद द्या; राहाता काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव

  शिर्डी/प्रतिनिधी : शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना द्यावे, असा ठराव राहता काँग्रेस कमिटीच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला प्रियंका सानप, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, युवक कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी यांची प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या अध्यक्षतेखाली राहाता तालुका काँग्रेस कमिटीची बैठक झाली.

  या बैठकीत शिर्डी संस्थानचा अध्यक्ष काँग्रेसचा करावा. अध्यक्षपद तालुक्याचे सुपुत्र नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य आमदार डाॅ. सुधीर तांबे यांना द्यावे, असा एकमताने ठराव करण्यात आला. यावेळी स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, श्रीकांत मापारी, बाळासाहेब खर्डे, सचिन चौगुले, सुरेश आरणे, रावसाहेब बोठे, यांची भाषणे झाली.

  बैठकीस भास्कर फणसे, रमेश गागरे, उमेश शेजवळ पंकज लोंढे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, नितीन सदाफळ, आमृत गायके, सार्थक करमसे, सुभाष निर्मळ, युनुसभाई, मुन्ना फिटर, अरुण जाधव, अभिषेक वाघमारे, मदन मोकाटे, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र निर्मळ यांनी आभार मानले.

  ”राहाता तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत घेतलेला संस्थान अध्यक्षपदाचा ठराव पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात येईल”.

  – प्रियंका सानप
  ……….
  संस्थानसह परिसराचा विकास होण्याकरिता संस्थानचे अध्यक्षपद डाॅ. तांबेना मिळाले पाहिजे.

  – डाॅ. एकनाथ गोंदकर