
तालुक्यातील गोणेगाव सोसायटीच्या झालेल्या निवडणूकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख प्रणित मुळा परिसर पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध करून सोसायटीवर आपला झेंडा रोवला.यावेळी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत परशराम कचरू रोडे यांची चेअरमनपदी तर अनिल दौलत काळे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नेवासा : तालुक्यातील गोणेगाव सोसायटीच्या झालेल्या निवडणूकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख प्रणित मुळा परिसर पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध करून सोसायटीवर आपला झेंडा रोवला.यावेळी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत परशराम कचरू रोडे यांची चेअरमनपदी तर अनिल दौलत काळे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या निवड प्रक्रियेप्रसंगी निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक परसराम रोडे,अनिल काळे,हबीब सरदार शेख,सौ. रंजना रघुनाथ दिघे, सोमनाथ देवराव काळे,सागर दिनकर काळे,केशव बन्सी बर्डे तर विरोधी संचालक बाबासाहेब रोडे असे १३ पैकी आठच सदस्य उपस्थित होते.
दि.१३ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १३ जागेसाठी गोणेगाव सोसायटीची निवडणूक झाली होती १३ पैकी ७ जागा मुळा परिसर पॅनलने जिंकल्या या निवडणुकीत मुळा परिसर पॅनलचे नेतृत्व विठ्ठलराव शेटे,दिनकरराव काळे व परसराम रोडे यांनी केले होते तर या निवडणुकीत विरोधी परिवर्तन पॅनलला सहा जागा मिळाल्या.त्यामुळे ७ संचालक असलेल्या मुळा परिसर पॅनलने मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गोणेगाव सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.के.खेडेकर यांनी काम पाहिले त्यांना सोसायटीचे सचिव श्री कोठूळे व लिपिक सुलतान शेख यांनी सहकार्य केले.