ram shinde

    जामखेड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कर्मचाºयामध्ये तुलना केली असता चतुर्थश्रेणी कर्मचाºयातील व एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यामध्ये फार मोठी तफावत आहे. राज्यात एका पाठोपाठ ३५ आत्महत्या झाल्या तरी या महाविकास आघाडी सरकारला जाग येत नाही. यावर एसटी. महामंडळाचे मंत्री बोलत नाहीत. मुख्यमंत्री बोलत नाहीत. कर्ते करविते बोलत नाहीत. कर्मचारी आत्महत्या करत असताना महाविकास आघाडी सरकार साधी चर्चा करायलाही तयार नाही, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारवर केली.

    माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी जामखेड एसटी अगाराच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत नुकतीच आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेत त्यांच्या भावना जाणुन घेतल्या. या संपाला भाजपच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, शहर अध्यध बिभिषण धनवडे, प्रविण चोरडिया, मोहन गडदे, डॉ. महेश मासाळ, गोरख घनवट, शिवकुमार डोंगरे, प्रसिद्धी प्रमुख उध्दव हुलगुंडे उपस्थित होते.

    दिवाळीच्या तोंडावरती सगळे एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी उपोषण, आंदोलन, धरणे आंदोलन करीत आहेत. एसटी कर्मचार्यांवर अन्याय,अत्याचार होत असून तसेच त्यांना पगार नाही. आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी च्या मुहूर्तावर राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करु शकत नाही. त्यांच्या प्रश्नांना व मागण्यांना न्याय देऊ शकत नाही. वास्तविक पाहता एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ येणं, सरकारने ऐन दिवाळीत विचारात न घेणं, चर्चा न करणं हे प्रश्न सोडवण्यासाठी न बोलवणं हे त्यांच्याप्रती असंवेदनशीलता दाखवण्यासारखे आहे.

    – प्रा. राम शिंदे, माजी मंत्री